
बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटना सोमेश्वरनगर तर्फे दरडग्रस्ताना मदत
Monday, August 9, 2021
Edit
सोमेश्वरनगर ( वार्ताहर )
बारामती तालुका आजी माजी सैनिक संघ सोमेश्वरनगर यानी दरडग्रस्त व अतिवृष्टीमुळे बाधीत कुटुंबासाठी मदतीचे आवाहन केले होते . त्याला सैनिकाबरोबर ग्रामस्थ ,पोलीस व सामाजीक संघटनानी देखील मोठा प्रतिसाद दिला व सुमारे पावणे दोन लाखाचे धान्य ,किराणा ,सुका मेवा ,खाऊ नवीन साड्या ,रोख मदत जमा झाली . सर्व मदत घेवुन आजी माजी सैनिक संघासह करंजे, चौधरवाडी तले कार्यकर्ते यानी महाबळेश्वर जवळील दरड ग्रस्त व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कळम ,मालुसरे व चिखली या दुर्गम भागातील लोकाना रविवारी पोहोच केली .
सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप ,वडगाव चे स पो नि सोमनाथ लांडे ,पुणे जिल्हा विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड ,कैलास मगर ,सरपंच वैभव गायकवाड ई च्या उपस्थीतीत सोमेश्वरहुन गाडी रवाना झाली त्यानंतर बारामती पर्यंत आणखी मदत मिळाली बारामती मधे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पी एस ओ मा तहसिलदार हनुमंत पाटील ,राष्ट्रवादी चे अध्यक्ष संभाजी होळकर ई .नी शुभेच्छा देत मदतीसाठी गरजु गावांची माहीती घेतली .
सैनिक संघटनेचे संस्थापक जगन्नाथ लकडे ,तक्रार निवारण समिती अध्यक्ष गणेश आळंदीकर ,कार्याध्यक्ष बाळासाहेब शेंडकर ,अनिल शिंदे ,राजाभाऊ थोपटे ,राजाराम शेंडकर नितीन शेंडकर ,बुवासाहेब हुंबरे, सुखदेव शिंदे तानाजी भापकर , बाळासाहेब चौधरी ई पदाधिकारी दरडग्रस्त भागात दुपारी व रात्री पोहोचले .
सैनिकाबरोबर स पो नि सोमनाथ लांडे व सहकारी वर्ग ,सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप ,करंजे च्या प्रणाली गृप चे बुवासाहेब हुंबरे व पदाधिकारी ,तसेच चौधरवाडी ग्रामस्थ ,पणदरे भिकोबानगर च्या जिजा माता शैक्षणिक संस्था व विनोद जगताप व सहकारी वर्ग , सुखदेव शिंदे व सहकारी पळशीचे पत्रकार काशीनाथ पिंगळे व गोलांडे तसेच वाकी करंजे परिसरातील नागरीक रमाकांत गायकवाड व कैलास मगर यांचेसह अनेक दानशुरानी रोख रक्कम व धान्य मदत दिले.
महाबळेश्वर पासुन ताफोळा गावाकडे उतरणारे रस्त्यावर २३/ २४ जुलैला मोठमोठ्या दरडी कोसळल्या व ७०० मिमी पावसाची विक्रमी नोंद झाल्याने येथील भातशेती पुर्ण नष्ट झाली आहे. घरांचे मोठे नुकसान झाले आहे या गावात जाणारे रस्ते अक्षरशः तुटुन गेले आहेत .त्यामुळे येथे जाणेसाठी अक्षरशः जीव मुठीत घ्यावा लागत आहे कळम गावाकडे जाण्यासाठी रस्तेच नाहीत पाऊल वाटेने एक तास वर यावे लागत आहे दुचाकी देखील या गावात जावु शकत नाही चिखली गावात गाडी जाते मात्र तिथे मोठ्या दरडी कोसळल्याने तेथे रस्ता बंद केला आहे मालुसरे गावात देखील जाता येत नाही एका रस्त्यापर्यंत हे लोक येत आहेत. शासनातर्फे फक्त १० किलो गहु दहा किलो तांदुळ व ५ किलो रॉकेल एवढी मदत करणेत आली आहे. सोमेश्वर च्या सैनिक संघटनेद्वारे परिसरातील दानशुरांच्या मदतीने जवळपास एक टन धान्य व किराणा प्रत्येक गावाला दिला असला तरी अद्याप या गावाना मदतीची गरज आहे .
दुर्गम भागात शिक्षक ठरतोय दुआ ..
महाबळेश्वर ताफोळा रस्त्यावर दुर्गम भागात शिक्षक वर्ग आपल्या ओळखीनी सत्य परिस्थीती समाजासमोर मांडत आहे व ग्रामस्थाना दिलासा देत आहे .
प्राथमिक शिक्षक गणेश पखाले ,दानवले व ढेबे,गोफणे हे या दुर्गम भागात शिकवत आहेत .त्यांच्या पिडीत ग्रामस्थाना .मदत देणे सुकर ठरत आहे त्यामुळे शिक्षक आता या ग्रामस्थांचा खरा आधार ठरल्याचे या दुर्गम भागात चित्र आहे .