-->
डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता:  के. बी. ऑरगॅनिक्सने तयार केलेल्या “बॅक्टो रेझ” मुळे तेल्या रोगाचे नियंत्रण करणे सहज शक्य

डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता: के. बी. ऑरगॅनिक्सने तयार केलेल्या “बॅक्टो रेझ” मुळे तेल्या रोगाचे नियंत्रण करणे सहज शक्य

फलटण - अलीकडच्या काळात डाळिंबावरील तेल्या रोगाची मोठ्या प्रमाणात वाढ दिसू लागल्याने महाराष्ट्रातील बहुतांश डाळिंबक्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. परंतु बॅक्टो रेझ या ओषधामुळे तेल्याचा बीमोड होण्यास मदत होणार असून परिणामी अडचणीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
         १५ ऑगस्ट २०२१ या भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर डाळिंब उत्पादकांना तेल्याच्या जुलुमी जोखडातून मुक्त करण्यासाठी तसेच निरोगी व निर्यातक्षम डाळिंबाच्या उत्पादनासाठी के. बी. बायो ऑरगॅनिक्सने ‘बॅक्टो रेझ’ हे उत्पादन बाजारामध्ये दाखल केले आहे.

          के. बी. उद्योग समूहाचे चे चेअरमन प्रकाश खखर, संचालक  सचिन यादव,  अशांत साबळे, रिसर्च व डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते या औषधाचे अनावरण झाले.

        ‘बॅक्टो रेझ’ हे औषध डाळिंबावरील तेल्या सोबतच इतर पिकातील जीवाणूजन्य करपा, पानांवरील ठिपके, कोबीवरील घाण्या रोग तसेच जीवाणूजन्य कुज व इतर जीवाणूजन्य रोगांवर हे अत्यंत प्रभावीपणे काम करते. वनस्पतीजन्य औषध असल्याने हे रोगावर नियंत्रण मिळवतेच त्यासोबतच याचे पिकांवर अतिशय चांगले परिणाम दिसतात व उत्पादनात भरघोस वाढ दिसते. खासकरून डाळिंब उत्पादकांसाठी हे औषध नक्कीच एक वरदान म्हणून उदयास येईल.

          के. बी. बायो ऑरगॅनिक्सच्या शास्त्रज्ञांनी तब्बल ५ वर्ष या औषधाच्या संशोधनासाठी अथक मेहनत केली आहे. ‘बॅक्टो रेझ’ हे जीवाणूनाशक निसर्गात आढळणाऱ्या विविध वनस्पतींच्या अल्कोलाॅइड संयुगांपासून बनविलेली आहेत. प्रयोगशाळेत या औषधाच्या विविध चाचण्या घेतल्या आहेत त्याचप्रमाणे या औषधाच्या विविध क्षेत्रांवर व विविध वातावरणीय परिस्थितीमध्ये चाचण्या घेण्यात आल्या ज्या पूर्णपणे यशस्वी ठरल्या आणि त्यानंतरच आम्ही हे उत्पादन बाजारात दाखल केले आहे. तत्पूर्वी आपण ‘बॅक्टो रेझ’ हे जीवाणूंच्या प्रादुर्भावावर कसे काम करते, हे जाणून घेऊया, मुख्यतः तेल्या हा जीवाणूंमधील नियंत्रणासाठी सर्वात अवघड समजला जाणारा रोग आहे, जो ‘झॅंथोमोनास ऑक्झीनोपोडीस’ या जीवाणूद्वारे उद्भवतो. हा जीवाणू पिकाच्या दोन पेशींमधील मोकळ्या जागेत वाढतो, ज्याला आपण आंतरकोषकीय जागा म्हणतो त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवणे खूप अवघड असते. याच जागेमध्ये हा जीवाणू तेलासारखा पदार्थ स्त्रवतो यावरूनच आपण या रोगाला तेल्या असे म्हणतो. के. बी. बायो ऑरगॅनिक्सचे ‘बॅक्टो रेझ’ हे नेमक्या याच आंतरकोषकीय जागेत जाऊन जीवाणूवर प्रभावी नियंत्रण मिळवते, जे इतर कोणत्याही औषधाला आजपर्यंत जमले नाही. या नियंत्रणानंतर त्या डागातील तेलकटपणा कमी कमी होतो व डाग कोरडा पडतो जे जीवाणू नियंत्रणाचे स्पष्ट निर्देशक आहे. यानंतरची होणारी डाळिंबाची वाढ ही अगदी निरोगी होते, ज्यावर जीवाणूचे कोणतेही लक्षण दिसत नाही.

         याआधी तेल्या हा एक भीषण रोग समजला जात होता. ह्या रोगाचा शिरकाव झाला रे झाला की डाळिंब उत्पादकांना बाग काढण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरत नव्हता. आजपर्यंत इतर औषधांना तेल्यावर नियंत्रण करणे शक्य झाले नव्हते मात्र आता वनस्पतीजन्य ‘बॅक्टो रेझ’ जे पूर्णपणे शाश्वत व पर्यावरणपूरक आहे, ज्यामुळे मित्रकिडींना कोणताही धोका पोहोचत नाही म्हणजेच बागेमध्ये मधमाशीचा वावर वाढून परागीकरण वाढते परिणामी उत्पादनात भरघोस वाढ होते जे पूर्णपणे रोगमुक्त, किडमुक्त व रसायनमुक्त असते ज्यामुळे डाळिंबाची निर्यात अगदी सोपी होते.

         विषाणूजन्य रोग, फुलकिडे, पिठ्या ढेकूण, नागअळी, अश्या सर्व प्रकारच्या रोग व किडींवर के. बी. बायो ऑरगॅनिक्सने अतिशय प्रभावी आणि परिणामकारक अशी उत्पादने उत्पादित केली आहेत ज्यांचा वापर करून आज हजारो शेतकरी रोग व किडमुक्त पिकांचे उत्पादन घेऊन निर्यातीची वाट चालत आहेत. आजपर्यंत के. बी. बायो ऑरगॅनिक्सच्या उत्पादनाचा वापर करून हजारो शेतकऱ्यांनी निरोगी व रसायनमुक्त पिकांचे उत्पादन घेतले आहे आणि या औषधांच्या वापराने ते समाधानी व आनंदी आहेत. निर्यातदार शेतकऱ्यांना सुद्धा या औषधाचा खूप फायदा झाला आहे, कारण निर्यातीसाठी रसायनमुक्त कृषीमालाला अनन्यसाधारण महत्व असते व के. बी. बायो ऑरगॅनिक्सच्या उत्पादनांच्या साथीने निर्यातक्षम उत्पादन मिळवणे सहजशक्य असते. ‘बॅक्टो रेझ’ हे उत्पादन सुद्धा याच श्रेणीतील व तितकेच गुणवत्तापूर्ण औषध आहे जे नक्कीच डाळिंब उत्पादकांच्या चेहऱ्यावर हसू उमलवेल अशी आम्हाला खात्री आहे अशी अपेक्षा यावेळी संचालक सचिन यादव यांनी बोलून दाखवली.

     संपर्क 

1.ASM Yogesh Yadav 9673003051

2.Sales Officer - Baramati 
Nilesh Gholap
8888549657

3.Sales officer Indapur 
Ganesh Labade
9921217754

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article