
बारामती: अजित पवार यांनी घेतला पियाजिओ कंपनीने तयार केलेल्या इलेक्ट्रिक रिक्षा चालवण्याचा आनंद
Saturday, August 28, 2021
Edit
बारामतीच्या पियाजिओ कंपनीने तयार केलेल्या इलेक्ट्रिक रिक्षाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शनिवार) ट्रायल घेतली. रिक्षा चालवण्याचा आनंद यावेळी अजित पवार यांनी घेतला.
अजित पवारांनी पियाजिओ कंपनीला भेट दिली. कंपनीच्या कार्यक्रमादरम्यान कंपनीने तयार केलेल्या इलेक्ट्रिक रिक्षाची त्यांनी बारकाव्याने पाहणी केली. एवढ्यावरच न थांबता पवार यांनी स्वतः ही इलेक्ट्रिक रिक्षा चालवून ट्रायल घेतली.
अजित पवार हे कोणतीही गोष्ट टिकावू व नीटनेटकी आहे का याची स्वतः खात्री करून घेतात, याची आज पुन्हा एकदा प्रचिती आली.