-->
बारामती: सांगवीत पोलीसांची अवैध दारू विक्रीवर धडक कारवाई; ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त करत ४ जणांवर गुन्हा दाखल

बारामती: सांगवीत पोलीसांची अवैध दारू विक्रीवर धडक कारवाई; ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त करत ४ जणांवर गुन्हा दाखल

बारामती तालुका पोलीसांनी अवैध दारू विक्रीवर मौजे सांगवी येथे धडक कारवाई करीत चार ठिकाणी छापा मारून ४ जणांवर गुन्हा दाखल करीत एकूणन ३१,७८५/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.बारामती तालूक्यातील बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मौजे सांगवी येथील चांदणी चौक व मिलिंद नगर मध्ये अवैध देषी-विदेषी दारू विक्री करनाऱ्या ४ इसमांवर बारामती तालुका पोलीस स्टेषनचे पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण यांचे मार्गदर्शनाखाली माडेगाव पोलीस चौकीचे सहा. पोलिस निरीक्षक राहुल घुगे, पो हवा रावसाहेब गायकवाड, पो ना राजेंद्र काळे, पो शी प्रशांत राऊत या पथकाने कारवाई करून मोठा दारूचा साठा जप्त केला आहे. याबाबत पो शी प्रशांत राऊत यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती बारामती तालुका पोलीस स्टेषनचे पोलीस निरीक्षक श्री महेश ढवान यांनी दिली आहे.
       सदरची कारवाई बारामती तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री. महेश ढवान यांच्या मार्गदर्षनाखाली माळेगाव पोलीस चौकीचे सहा. पोलिस निरीक्षक राहुल घुगे, पो हवा रावसाहेब गायकवाड, पो ना राजेंद्र काळे, पो शी प्रशांत राऊत जाधव यांनी केली आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article