
पुरंदर: भावा-बहिणीने केले रक्षाबंधनाचे शतक पूर्ण
अनुसया ह्या गजानन यांच्या पेक्षा दोन वर्षांनी मोठ्या आहेत. जन्मानंतर तीन वर्षाच्या असल्यापासून त्या गजानन यांच्या हातावर राखी बांधत आहेत. अनुसया यांचा विवाह झाल्या नंतरही रक्षाबंधनाचा दिवस त्या चुकवत नाहीत. पूर्वी वाहतुकीची सोय नव्हती तरी गजानन सायकलवरून बहिणीकडे राखी बांधण्यासाठी जात होते.
तसेच गजानन यांना वेळ नसल्यास अनुसयाबाई ह्या चालत येऊन राखी बांधत होत्या. हे दोघे भाऊ बहीण नियमित ज्ञानेश्वरी वाचन व हरिपाठ करीत करतात. त्यांनी अनेक वर्षे पायी वारी देखील केली आहे. दोघे भाऊ बहीण यांना शेतीची आवड असल्याने त्यांनी आपल्या कुठल्याही मुलाला नोकरीला न लावता शेती करायला लावली त्यामुळे त्यांची मुले आज या परिसरात प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या घरी आजही एकत्र कुटुंब पद्धती आहे.
आज आपल्याला समाजामध्ये मालकी हक्काच्या कायद्यात अनेक बदल झाल्यामुळे अनेक ठिकाणी जमिनीवरून भाऊ-बहिणीचे वाद झालेले पाहायला मिळतात मात्र अनुसया आणि गजानन या शतकवीर भाऊ बहिणीचे प्रेम समाजाला दिशादर्शक असून हे अतूट नाते आधुनिक युगात देखील खूप काही गोष्टी शिकवून जातात.