-->
बारामती: विळ्याचा धाक दाखवून मंगळसूत्र हिसकवले; आरोपी CCTV फुटेजमध्ये कैद

बारामती: विळ्याचा धाक दाखवून मंगळसूत्र हिसकवले; आरोपी CCTV फुटेजमध्ये कैद

सुपे- बारामती तालुक्यातील उंडवडी येथे शेतात काम करणाऱ्या एका महिलेला विळ्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत तिच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र पळवल्या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
          याबाबत लक्ष्मी देवीदास गवळी वय ५५ वर्ष रा.उंडवडी सुपे ता.बारामती जि.पुणे  यांनी वडगाव निंबाळकर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यावरून तीन अज्ञात आरोपी  अंदाजे २० ते २५ वर्षे वयाचे यांचे विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
    सविस्तर हकीकत अशी शेतात फिर्यादी उडीद पीकाची खुरपणी करीत असताना ३ अज्ञात मुलांनी महिलेच्या गळ्यातील २२ हजार रुपये  कीमंतीचे, एकुण ४.७५ ग्रॅम वजनाचे,  सोन्याचे मणीमंगळसुत्र व पोत त्यामध्ये सोन्याचे मणी व शिंपला आकाराच्या वाटया असलेले विळयाचा धाक दाखवुन,जिवे ठार मारण्याची धमकी देवुन जबरीने चोरी करून चोरून नेले आहे म्हणुन फिर्यादीचे  त्यांचेविरूध्द कायदेशीर तक्रार आहे. वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article