-->
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रितसर परवानगी काढून नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा करावा- API सोमनाथ लांडे

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रितसर परवानगी काढून नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा करावा- API सोमनाथ लांडे

कोऱ्हाळे बु-   गणेश उत्सव २०२१ अनुषंगाने महाराष्ट्र शासन कडून मार्गदर्शक सूचना प्रसारित झालेल्या असून त्याची माहिती वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशोत्सव आयोजक,गणेशमूर्ती निर्माते,विक्रेते यांना देणेच्या अनुषंगाने कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावमुळे सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशउत्सव मंडळ आयोजकांची एकत्र बैठक आयोजित न करता आज दिनांक ०१/०९/२०२१ रोजी दुपारी ०१.०० वा ते सायं ०७.१५ वा चे दरम्यान पणदरे, करंजेपुल, सुपा दुरक्षेत्र व मोरगाव पोलीस मदतकेंद्र या ठिकाणी स्वतंत्र शांतता बैठकांचे आयोजन करण्यात आलेले होते,  उपस्थितांना सपोनि श्री.सोमनाथ लांडे यांनी शासन मार्गदर्शक सूचनांची माहिती देऊन खालील महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत.

१) यावर्षी गणेश मंडळांना मंडप टाकुन गणेशमूर्ती स्थापना करणेस परवानगी आहे, पण त्या करिता पोलीस स्टेशन मधून रीतसर कायदेशीर परवानगी घेणे आवश्यक राहील.
२) श्री.गणेशाची मूर्ती ही सार्वजनिक मंडळ यांनी ४ फुटाच्या आत व घरगुती श्री गणेशाची मूर्ती २ फुटाच्या आत असणे आवश्यक आहे.
३) श्री गणेश मुर्ती स्थापना दिवस व विसर्जन दिवशी मिरवणूक काढणेस परवानगी नाही.
४) मंडप ठिकाणी निर्जंतुकीकरण तसेच थर्मल स्कॅनिंग ची व्यवस्था ठेवावी. तसेच फिजीकल डिस्टनिंग  तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायजर) चा वापर करावा.
५) श्री गणेश उत्सव साजरा करताना आरती,भजन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करत असताना कोठेही गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी.तसेच ध्वनी प्रदूषण संदर्भातील नियम व तरतूदीचे पालन करावे.
६) श्री गणेश मूर्ती विसर्जन वेळी नदीकाठ,ओढे नाले, विहिरीवर एकाचवेळी गर्दी होणार नाही.याची दक्षता घ्यावी
७) श्री.गणेश मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम ऐवजी कोरोना विषाणूचे पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन करून त्याद्वारे कोरोना,मलेरिया,डेंगू इ. आजार आणि प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता बाबत जनजागृती करावी.असे आवाहन सपोनि सोमनाथ लांडे सो यांनी केलेले आहे 
         
         वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन कडील फिरते पोलीस पथक,पोलीस पाटील यांचे माध्यमातून कडक देखरेख ठेवण्यात येणार असून वरील सर्व सुचनांकडे दुर्लक्ष करून कोरोना विषाणूचे प्रादुर्भाव वाढीसाठी कारणीभूत ठरणारे नियमबाह्य श्री.गणेश मंडळ पदाधिकारी यांचे कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असले बाबतची माहिती त्यांनी दिली. 
         सदर बैठकीस सपोनि सोमनाथ लांडे , पोसई सलिम शेख यांचे सह संबधित दुरक्षेत्र अंमलदार व गणेश मंडळ अध्यक्ष,पदाधिकारी, गणेशमूर्ती विक्रेते, पोलीस पाटील उपस्थित होते

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article