
पुणे जिल्हा परीषदेमार्फत महास्वच्छता व महाश्रमदान कार्यक्रम उत्साहात संपन्न
Thursday, September 16, 2021
Edit
मोरगाव : जिल्हा परीषद पुणे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ, सुंदर व कचरामुक्त पुणे जिल्हा कार्यक्रमाचे आज आयोजन केले होते.
या अंतर्गत बारामती तालुक्यातील ग्रामपंचायती मार्फत महास्वच्छता व महा श्रमदान करण्यात आले. मोरगाव, तरडोली सह परीसरातील गावांत रस्ते व परीसराची स्वच्छता करण्यात आली यामध्ये गावचे सरपंचांसहीत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता
आज पुणे जिल्हा परीषदे मार्फत प्रत्येक गावमध्ये महास्वच्छता व महाश्रमदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम मोरगाव, तरडोली, आंबी, लोणी भापकर, मासळवाडी, मुर्टी आदी गावात संपन्न झाला. मोरगाव येथे ग्रामपंचायत पार्कींग, रस्ते, सार्वजनिक स्वच्छतागृह परीसर आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. यावेळी सरपंच निलेश केदारी, ग्रामसेवक मोरेश्वर गाडे, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
तर तरडोली येथे प्राथमिक शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय परीसर स्वच्छ केला. यावेळी सरपंच नवनाथ जगदाळे, उपसरपंच महेंद्र तांबे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ, प्राथमिक शाळा शिक्षक उपस्थित होते. या महास्वच्छता कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या ग्रामस्थांचे सरपंच केदारी यांनी आभार मानले.