
बारामती: कोऱ्हाळे बु|| जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका उज्ज्वला बनकर यांचे काम कौतुकास्पद - सचिन खोमणे
Friday, September 24, 2021
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पालक मेळावा आयोजित केला होता. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत सौ उज्वला बनकर यांना सन 2021 22 या वर्षाचा आदर्श पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन खोमणे यांनी सांगितले की, उज्वला बनकर यांची नोकरी याच शाळेत सुरू झाली होती व याच शाळेत सेवानिवृत्त होत आहेत हा योगायोग आहे. बनकर मॅडम या अतिशय शांत मनमिळावू व विद्यार्थी प्रिय आहेत.
या पालक मेळाव्यात केंद्राचे केंद्रप्रमुख श्री संपत जरांडे यांनी शाळा व्यवस्थापन समितीने सीसीटीवी कॅमेरा बसवल्याने त्यांचे कौतुक केले. या मेळाव्यात स्तर निश्चिती करून एका स्तराच्या शिकवणीसाठी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत दीपाली चव्हाण यांची दोन महिन्यासाठी नेमणूक करण्यात आली. राष्ट्रीय पोषण महा अंतर्गत वनिता जाधव यांनी पोषण आहाराचे महत्त्व सांगताना संतुलित आहार कसा असावा हे समजून सांगितले.
तसेच यावेळी परसबागेची निर्मिती केल्याचे अशोक देवकर यांनी सांगितले.
यावेळी व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रकाश हूंबे, सदस्य संदीप ननावरे, रुबीना शेख, आयेशा शेख, रूपाली धुमाळ, अंकिता शिरसागर या उपस्थित होत्या.