-->
कृषिदूत जुबेर मुलाणी यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी वृक्षारोपण

कृषिदूत जुबेर मुलाणी यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी वृक्षारोपण

इंदापूर तालुक्यातील रुई येथे वसंतराव नाईक ग्रामीण कृषि महाविद्यालय नेहरूनगर ,कंधार  ता. कंधार  जि. नांदेड येथील  कृषिदुत कु.जुबेर उस्मान मुलाणी याचे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक संलग्न  2021-22 कार्यक्रमासाठी  आगमन झाले. त्याने ग्रामपंचायत  कार्यालयाला भेट देऊन दिनांक 17 सप्टेंबर  रोजी वृक्षारोपण करून सरपंच व ग्रामसेवकाकङुन  गावाची सविस्तर माहीती घेतली. याप्रसंगी शेतकरी शिवाजी लावंड  स्वप्नील लावंड,विकी मारकड अक्षय मारकड, माऊली लावंड विजय माने  तसेच  ग्रामस्थ उपस्थिती होते.तर कृषि  क्षेञासी सलग्नित कार्यक्रम. वसंतराव नाईक ग्रामीण कृषि महाविद्यालय नेहरूनगर ,कंधार  चे प्राचार्य डी. जी. मोरे सर   कार्यक्रम अधिकारी डॉ ए. एच. नण्हेर सर, डॉ के.बी पलेपाड सर,डॉ व्ही.एस .पवार सर  प्रा पी.एस काळे मॅडम, प्रा. जी. एस. वाळकुंडे मॅडम कार्यक्रम समन्वयक प्रा  बी. एम. गोणशेटवाड सर ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक संलग्न  संबंधित सर्व प्राध्यापक उस्मान मुलाणी शिक्षक यांच्या मार्गदर्शना खाली होत आहे. ग्रामीण जागरूकता कार्यानुभव अंतर्गत शेतातील विविध  समस्या  व निरसन, माती परिक्षण, जलसंवर्ध, बिजप्रक्रीया, पिकावरील किङ व रोग व विविध  नवीन कृषी उद्योग व  शेतीविषयक  संकल्पना यावर शेतकर्याशी संवाद साधनार आहेत.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article