
बारामती: मळद येथे शेतकऱ्यांना माती परीक्षणावर मार्गदर्शन
Tuesday, September 14, 2021
Edit
बारामती- ग्रामीण जागृकाता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत मळद येथील शेतकऱ्यांना रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूजच्या कृषीदुताने माती परीक्षणान प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच कृषीदुत सिद्धांत चव्हाण यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षण यावर माहिती दिली.माती परिक्षणाचा मूळ उद्देश हा जमिनीत पीक वाढण्यासाठी तसेच आवश्यक घटकांची कमतरता भरून काढणे हा आहे . जमिनीत गरजे इतकेच खतांचे प्रमाण शेतकऱ्यांनी वापरावे कंपोस्ट खते व सेंद्रिय खते वापरामुळे तसेच आलटून पालटून पिके घेतल्यास जमिनीचे आरोग्य टिकून राहण्यास मदत होते , असेही सिद्धांत चव्हाण यांनी सांगितले . मातीचा नमुना कसा घ्यावा ? घेऊ नये ? मातीची उत्पादकता सुधारण्यासाठी काय करावे ? यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले . यासाठी कृषीदुतला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंग मोहिते पाटील , समन्वयक डी.पी.कोरटकर , महाविद्यालयाचे प्राचार्य आर जी नलवडे , कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. एकतपुरे , प्रा. डी. एस. मेटकरी , प्रा एस. आर अडत यांचे मार्गदर्शन लाभले . यावेळी प्रशांत शेंडे , नितीन शेंडे , प्रशांत कांबळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थीत होते.