-->
"मु. सा. काकडे महाविद्यालयात 'तीन दिवसीय व्याख्यानमालेने' हिंदी दिवस साजरा"

"मु. सा. काकडे महाविद्यालयात 'तीन दिवसीय व्याख्यानमालेने' हिंदी दिवस साजरा"

सोमेश्वरनगर: येथील मु. सा. काकडे महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि हिंदी दिवसा निमित्त दिनांक. १३ सप्टेंबर २०२१ ते १४ सप्टेंबर २०२१ या कालावधीत तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. व्याख्यानमालेचे उद्घाटन महाविद्यालयाचे सचिव व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रा. जयवंतराव घोरपड़े यांचे शुभहस्ते ऑनलाइन करण्यात आले.  प्रथम दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, हिंदी विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. विजय कुमार रोडे यांनी "हिंदी की भविष्यत् उपलब्ध संधियों के लिए आवश्यक कौशल" या विषयावर आपले विचार व्यक्त केले.  रोजगाराच्या विविध संधी प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी भाषाज्ञान, सामाजिक ज्ञान याचा परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे असे विचार व्यक्त केले. दुसरे दिवशी न्यू आर्ट्स, कॉमर्स,सायंस कॉलेज अहमदनगरचे प्रा. डॉ. हनुमंत जगताप यांनी "भारतीय परिवेश में हिंदी का महत्व" या विषयी विचार व्यक्त केले. समारोपाच्या दिवशी  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष  प्रो. डॉ. सदानंद भोसले यानी हिंदी भाषेला अनुसरुन रोजगार प्राप्त करावयाचा असेल तर मुलांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेची भाषिक कौशल्य प्राप्त केली पाहिजेत असे विचार मांडले. या व्याख्यानमालेसाठी तीन ही दिवस महाविद्यालयाचे सचिव. प्रा. जयवंतराव घोरपडे,  सहसचिव. श्री. सतीश लकड़े, महाविद्यालयाचे प्राचार्य. जवाहर चौधरी, उपप्राचार्य. डॉ. साळवे सर, डॉ. कदम मैडम, डॉ. ताटे सर,  प्रा. जगताप मैडम, प्रा.  गायकवाड सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.  या व्याख्यानमाले मध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश इत्यादि राज्यातील अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी हिंदी विभाग प्रमुख प्रा. अच्युत शिंदे यांनी प्रास्ताविक तर आइ. क्यू.ए. सी चे समन्वयक डॉ.  संजू जाधव यांनी आभार मानले. दुसरे दिवशी प्रा. डॉ. कल्याणी जगताप यांनी प्रास्ताविक व प्रा. पोपट जाधव यांनी आभार मानले. तीसरे दिवशी प्रा. पोपट जाधव यांनी प्रास्ताविक व आभार प्रा. अच्युत शिंदे यानी मानले. ही व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी हिंदी विभागाचे व इतर विभागांच्या सर्व प्राध्यापकांनी विशेष सहकार्य केले. प्रा. प्रवीण जाधव, जगताप सर यांनी विशेष सहकार्य केले. या व्याख्यानमालेमध्ये ३४१  प्राध्यापक व विद्यार्थी यांनी नाव नोंदणी करुन आपली उपस्थिती दाखवली.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article