
धर्मवीर संभाजीराजे गणेशोत्सव तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न
Friday, September 17, 2021
Edit
कोऱ्हाळे बु- धर्मवीर संभाजीराजे गणेशोत्सव तरुण मंडळाच्या वतीने आज रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 37
रक्तदात्यांनी उत्फूर्तपणे रक्तदान केले.
रक्तदान शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुकाध्यक्ष श्री संभाजी होळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे एपीआय सोमनाथ लांडे, दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप, सुनील खलाटे, हेमंत गडकरी, सरपंच सौ.रेखा बनकर, उपसरपंच कल्याण गावडे, पोलीस पाटील नितीन थोपटे व मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
धर्मवीर संभाजीराजे गणेशोत्सव तरुण मंडळ व बारामती येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट, मानिकाबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा असल्याने ब्लड बँकेतून रक्त पुरवठा करणे अशक्य झाले आहे. रक्तदान शिबिरे आयोजित करून ब्लड बँकेत रक्त संकलित केले जाते मात्र रक्तच उपलब्ध नसल्याने गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करणे अशक्य झाले होते. या पार्श्वभुमीवर ब्लड ब्लड बँकेच्या विनंतीवरुन श्री.काशिविश्वेश्वर तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
गेले अनेक वर्षापासुन ब्लड बँकेच्या गरजेनुसार तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.
गणेशोत्सवानिमित्त धर्मवीर संभाजीराजे गणेशोत्सव तरुण मंडळाच्या वतीने शिबिराचे तत्काळ रक्तदान शिबीर आयोजित करून 37 रक्तदात्यांनी रक्तदान करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.