
गणेशोत्सवानिमित्त धर्मवीर संभाजीराजे गणेशोत्सव तरुण मंडळाच्या वतीने शुक्रवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
Tuesday, September 14, 2021
Edit
बारामती: बारामती तालुक्यातील सावंतवस्ती, थोपटेवाडी
येथे गणेशोत्सवानिमित्त धर्मवीर संभाजीराजे गणेशोत्सव तरुण मंडळाच्या वतीने शुक्रवार दि.१७ रोजी कोरोना नियमांचे पालन करत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे अजूनही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, येणाऱ्या काळात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून व वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनने केलेल्या अवाहनाला प्रतिसाद देत या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी पंचक्रोशीतील ज्या नागरिकांना रक्तदान करायचे आहे त्यांनी शुक्रवारी सकाळी १० वाजता धर्मवीर संभाजीराजे गणेशोत्सव तरुण मंडळ, सावंतवस्ती थोपटेवाडी येथे हजर राहण्याचे अवाहन मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे.