
जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हद्दीत उद्या तक्रार निवारण दिन; पोलीस स्टेशनकडे प्रलंबीत असलेल्या अर्ज प्रकरणांचा होणार निटपारा
Wednesday, September 8, 2021
Edit
पुणे : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या परीपत्रकानुसार पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक अभीनव देशमुख यांनी दि. ९ रोजी तक्रार निवारण दिन ठेवण्यात आला आहे. यानिमित्ताने पोलीस स्टेशनकडे प्रलंबीत असलेले अर्ज प्रकरणे कामाचा निपटरा केला जाणार आहे. यामध्ये जिल्ह्यात बारामती तालुक्यातील ३ पोलीस स्टेशनसहीत ईतर १६ पोलीस स्टेशनचा समावेश आहे.
कोरोना १९ मुळे पुणे जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिन ठेवण्यात आला नव्हता. यामुळे पोलीस स्टेशन हद्दीत पुणे पोलीस ग्रामीण अधीक्षक डॉ. अभीनव देशमुख यांनी उद्या गुरुवार दि.९ रोजी हा दिन साजरा करुन प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यास सांगितले आहे. यासाठी संबंधीत अर्जदार, गैरअर्जदार यांनी कागदपत्रासहीत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
उद्या बारामती शहर, बारामती तालुका, वडगांव निंबाळकर, घोडेगाव, मंचर, आळेफाटा, ओतूर, भिगवण, वालचंदनगर, सासवड, लोणावळा शहर,लोणावळा ग्रामीण, जुन्नर, नारायणगाव, खेड, मंचर, हवेली, दौंड, यवत या ठिकाणी हा दिन साजरा केला केला जाणार आहे. तक्रार निवारण दिनी वरीष्ठ अधीकारी, दुय्यम अधीकारी, पोलीस अंमलदार उपस्थित राहणार आहेत.