-->
बारामती: तरडोलीच्या सरपंच उपसरपंचचांची नामी शक्कल: उद्या गावात भरणार अधीकाऱ्यांचा दरबार

बारामती: तरडोलीच्या सरपंच उपसरपंचचांची नामी शक्कल: उद्या गावात भरणार अधीकाऱ्यांचा दरबार

मोरगाव :  कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे राज्यातील अनेक गावांतील  ग्रामपंचायतीस ग्रामसभा घेता येत नाही यामुळे बहुतांश विकास कामांना कात्री लागली आहे. विकास कामांबरोबरच गावातील  अनेक ग्रामस्थांचे प्रश्न जैसे थे अवस्थेत आहेत. यामुळे आपल्या गावातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी  तरडोली ता बारामती येथील  सरपंच नवनाथ जगदाळे  व उपसरपंच महेंद्र तांबे यांनी नामी शक्कल शोधली आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी  उद्या दि. ८ रोजी कृषी, महसूल, आरोग्य, कर्मचारी व  अधीकाऱ्यांचा दरबार बोलवला आहे.

गेल्या दिडवर्षापासुन कोरोना या विषाणूजन्य  आजारामुळे बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावात  ग्रामसभा होत नाहीत.  कोरोनामुळे  गावातील शेतकऱ्यांसह, अनेक मजुरवर्ग,  विद्य्यार्थ्यांचे पालकांचे गावपातळीवरील अनेक समस्या जैसे थे आहेत. यामुळे बारामती तालुक्यातील तरडोली गावचे  सरपंच नवनाथ जगदाळे व  उपसरपंच महेंद्र तांबे यांनी कृषी, आरोग्य विभाग, महसूल, प्राथमिक शाळा शिक्षक, पशु संवर्धन, महावितरण कंपनी, महीला बालविकास आदी अधीकारी  व कर्मचारी बोलावले  आहेत.

 वरील खात्याअंतर्गत ज्या शेतकऱ्यांची, मजुरवर्गीय व गावात राहत असलेल्या ग्रामस्थांची  कामे रखडली आहेत त्यांना  विविध वेळेत पाचारण केले आहे. तसेच संबंधीत व्यक्तींनी आपल्या अर्जा मार्फत समक्ष उपस्थित रहावे अथवा  व्हॉट्स अप द्वारे अर्ज पाठवावा असे सांगितले आहे.  सरपंच, उपसरपंचांनी जनतेसाठी भरवणार असल्याल्या अधीकाऱ्यांच्या या दरबाराची चर्चा परीसरात चांगलीच रंगली आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article