
बारामती: आद्य क्रांतीवीर राजेउमाजी नाईक जयंती मोठ्या उत्साहात संपन्न
Tuesday, September 7, 2021
Edit
मोरगाव : मोरगाव ता. बारामती येथे आज दि, ७ रोजी आद्य क्रांतीवीर राजेउमाजी नाईक जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. जयंती निमित्त मोरगाव ग्रामपंचायतमध्ये राजे उमाजी नाईक यांनी प्रतिमेची पूजा करण्यात आली.
आज राजे उमाजी नाईक जयंती तालुक्याच्या पश्चिम भागातील मोरगाव, मुर्टी, आदी परीसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मोरगाव येथे सरपंच निलेश हरिभाऊ केदारी यांनी उमाजी नाईक यांच्या प्रतीमेला पुष्पाहार घातला यावेळी ग्रामसेवक मोरेश्वर गाडे, तसेच जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य महेश जाधव, जय मल्हार क्रांती संघटना मोरगाव शाखा अध्यक्ष पप्पू चव्हाण, रवींद्र बाप्पू जाधव, दत्तात्रय जाधव, किसन घुसाळकर खजिनदार मोरगाव, विकास जाधव सदस्य मोरगाव, चनवीर जमादार इतर मान्यवर उपस्थितीत होते.