-->
मोरगाव: अष्टविनायक तीर्थक्षेत्र मयुरेश्वर मंदिरात आजपासून भाद्रपद यात्रा उत्सव सुरू, शासनाच्या आदेशामुळे दर्शनासाठी मंदिर मात्र बंद

मोरगाव: अष्टविनायक तीर्थक्षेत्र मयुरेश्वर मंदिरात आजपासून भाद्रपद यात्रा उत्सव सुरू, शासनाच्या आदेशामुळे दर्शनासाठी मंदिर मात्र बंद

मोरगाव :  कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे अष्टविनायक आराध्यदैवत मोरगाव ता. बारामती येथील मयुरेश्वर मंदिर राज्य शासनाच्या आदेशानुसार  सर्व भावीकांना दर्शनासाठी बंद आहे. आजपासून येथील यात्रेस सुरुवात झाली असल्याने  मंदिर बंद असले तरी गणेश भक्त  पायरी दर्शन घेऊन जाताना आढळत  होते.
आज  यात्रेनिमित्त पहाटे पाच वाजता गुरव मंडळीची प्रक्षाळ पूजा झाली. तर सकाळी सात वाजता सालकरी ढेरे व दुपारी बारा वाजता ट्रस्टच्या वतीने  श्रींची पूजा संपन्न झाली. पायरी व कळस दर्शनासाठी  दिवसभर पुणे जिल्हयासह, सातारा, सोलापूर, मुंबई  आदी जिल्ह्यातून भक्त आले होते. भाद्रपदवारी वाया जाऊ नये म्हणून  मंदिर बाहेरुन भक्त  दर्शन घेताना  आढळून येत होते.

 आज यात्रेनिमित्ताने दुपारी तीन वाजता हिरे, माणिक, मोती युक्त, सुवर्णालंकार काढण्यात आले.  हे अलंकार  चढविण्याचे काम  सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरु होते. मंदिर बंद असल्याने मोरगावसह परीसरातील भक्तांना  मयुरेश्वराचे दर्शन हेता यावे म्हणून  सुवर्णालंकार युक्त पोशाखाचे फोटो सोशल मोडीयाद्वारे  प्रसारीत करण्यात आले. अनेक भक्तांनी  श्रींचे दर्शन याद्वारे घडल्याने धन्यता मानली. रात्री उशीराने काही निवडक मानकऱ्यांच्या उपस्थितीत मयुरेश्वराचा छबिना निघणार होता.




Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article