
बारामती: अखेर मनोहर(मामा) भोसले व इतर दोघांवर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद, २.५ लाखांची फसवणूक करून पैसे परत माघीतल्यास दिली जीवे मारण्याची धमकी
Thursday, September 9, 2021
Edit
बारामती- तक्रारदार श्री शशीकांत खरात रा साठेनगर, कसबा बारामती ता बारामती जि पुणे यांचे वडीलांना थायरॉईड कॅन्सर हा दुर्धर आजार झाला असताना यातील तक्रारदार हे मनोहरमामा भोसले रा उंदरगांव ता करमाळा जि सोलापुर या भोंदुबाबाच्या मौजे सावंतवाडी, गोजूबावी, ता बारामती जि पुणे मठामध्ये गेले असता त्याने तो बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव करून, तक्रारदार यांच्या वडीलांचा गळयावरील थायरॉईड कॅन्सर बरा करतो असे सांगून त्यावरील औषध म्हणून बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास देवून विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे यांच्यासोबत संगणमत करून वेळोवेळी चढावा, अभिषेक व भेटीसाठी त्यांचेकडून एकुण २,५१,५००/- रुपये त्यांचे व त्यांचे वडीलांचे जिवाचे बरे वाईट होईल अशी भिती घालून देण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केली व पैसे परत मागीतल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत तकारदार यांचे तकारीवरून आरोपी १) मनोहर मामा भोसले रा उंदरगांव ता करमाळा जि सोलापुर, २) विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा ३) ओंकार शिंदे यांच्याविरूध्द भारतीय दंड विधान, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुश, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध व उच्चाटण कायदा व औषधे व चमत्कारी उपाय (अक्षेपार्ह जाहीरात) अधिनियमान्वये बारामती तालुका पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे नोंद करण्यात आला आहे.
याव्दारे आम्ही बारामती तालुक्यातील सर्व नागरीकांना आवाहन करतो की, बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव करून मनोहर मामा भोसले रा उंदरगांव ता करमाळा जि सोलापुर व त्याचे साथीदारांनी कोणाची फसवणुक वा भिती घालून पैसे देण्यास भाग पाडले असेल त्यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशनला संपर्क साधावा.
सदर गुन्हयाचा तपास मा. श्री अभिनव देशमुख सो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा. श्री. मिलींद मोहीते सोो, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग व मा.श्री. नारायण शिरगावकर सो उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग बारामती पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक राहुल घुगे हे करीत आहेत.