
भाद्रपद यात्रा उत्सवाच्या निमित्ताने श्रीमान महासाधू मोरया गोसावी प्राप्त मंगलमुर्ती पालखी सोहळा आज मोरगावमध्ये दाखल होणार
Thursday, September 9, 2021
Edit
मोरगाव : भाद्रपद यात्रा उत्सवाच्या निमित्ताने श्रीमान महासाधू मोरया गोसावी प्राप्त मंगलमुर्ती पालखी सोहळा आज दि. ९ रोजी सायंकाळी ७ वाजता चिंचवड येथून मोरगाव ता. बारामती येथे येणार आहे. कोरोनामुळे मंगलमुर्ती स्वारी गाडीतून आणली जाणार आहे. यामुळे पालखी स्वागतागतासाठी मंदिर गाभारा फुलांनी तर परीसर विद्युत रोषणाईने सजवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे.
कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे राज्यातील सर्व प्राथना स्थळांबरोबर अष्टविनायक तीर्थक्षेत्र मयुरेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद आहे. केवळ धार्मिक कार्य संपन्न होत आहेत. भाद्रपद यात्रेच्या निमित्ताने उद्या मयुरेश्वर भेटीसाठी चिंचवड येथून मोरया गोसावी प्राप्त मंगलमुर्ती पालखी सोहळा मोरगाव येथे येणार आहे.
मंगलमुर्ती स्वागतासाठी दर्शन गाभारा फुलांच्या सुंदर माळांनी सजवण्याचे काम सुरु आहे. तर मंदिर परीसरातील विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. मंदिर सजवल्यामुळे मंदिराच्या वैभवात भर पडली आहे.