-->
बारामती तालुका सोशल मीडियाच्या पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी महेश जगताप तर उपाध्यक्षपदी अमर वाघ

बारामती तालुका सोशल मीडियाच्या पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी महेश जगताप तर उपाध्यक्षपदी अमर वाघ

बारामती -  पुणे जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या बारामती तालुका मराठी संघाच्या बारामती तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सोमेश्वर येथील महेश जगताप तर उपाध्यक्ष पदी कोऱ्हाळे बुद्रुक येथील अमर वाघ यांची तर सचिव पदी शुभम अहिवळे यांची निवड करण्यात आली. बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी यांनी ही निवड जाहीर केली.
    यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, राज्याचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव व सोशल मीडिया चे राज्य प्रमुख बापूसाहेब गोरे, सोशल मीडिया चे जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे, जिल्हा समन्वयक सुनील जगताप, हवेलीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र काळभोर, पिंपरी चिंचवड चे सोशल मीडिया अध्यक्ष सूरज साळवे व बारामती तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष हेमंत गडकरी यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार योगेश भोसले यांनी मानले. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व बारामती तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने  पत्रकारांना मेडिकल किटचे वाटप करण्यात आले 
यावेळी पुढील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
अध्यक्ष - महेश जगताप
उपाध्यक्ष - अमर वाघ
सचिव - शुभम अहिवळे
खजिनदार - रुपेश होले
तालुका समन्वयक - तुषार धुमाळ
कार्यकारिणी सदस्य - कल्याणी जगताप, सोमनाथ जाधव, महेश चव्हाण, सिकंदर शेख, महेश चव्हाण 
    
  निवडी नंतर बोलताना नूतन अध्यक्ष महेश जगताप म्हणाले की येणाऱ्या काळात राज्याचे सोशल मीडिया अध्यक्ष बापूसाहेब गोरे, जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे, बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सोशल मीडिया मध्ये काम करणाऱ्या पत्रकार मित्रांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article