
चाफळ येथील तरुणीच्या खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा द्या; जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने dysp ना निवेदन
Wednesday, September 29, 2021
Edit
चाफळ ( जि. सातारा ) येथील रामोशी समाजातील तरुणीच्या खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने बारामतीचे पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे यांना देण्यात आले.
चाफळ जि. सातारा येथील अल्पवयीन तरुणीची एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या करण्यात आली होती. याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. त्यामुळे बारामती येथे जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. जय मल्हार क्रांती संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मदने यांच्या अध्यक्षतेखाली रामोशी समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस उपअधीक्षक यांची भेट घेत हे निवेदन दिले. सदर खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, मयत मुलीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व्हावी, कुटुंबीयांना पोलीस संरक्षण मिळावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
संघटनचे जिल्हा प्रवक्ते रामदास खोमणे, अनिल भंडलकर, रवींद्र जाधव, पांडुरंग घळगे, विकास जाधव, सागर जाधव, संतोष भंडलकर, प्रवीण माकर, सचिन यादव, विजय तावरे, हिंदुराव सोरटे उपस्थित होते.
अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन
राज्यभरात महिला अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिला वर्गात असुरक्षिततेचे वातावरण आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन व शासनाने याची गंभीर दखल घ्यावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू असा इशारा जय मल्हार क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष नानासाहेब मदने यांनी दिला आहे.