-->
मास्क म्हणून रुमाल वापरताय तर वेळीच सावध व्हा! रुमालाचा वापर मास्क म्हणून केल्यास 500 रुपयांचा दंड लागणार

मास्क म्हणून रुमाल वापरताय तर वेळीच सावध व्हा! रुमालाचा वापर मास्क म्हणून केल्यास 500 रुपयांचा दंड लागणार

राज्यातील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर कोरोनाची लस घ्यावी, कोरोनाची स्थिती पूर्ण नियंत्रणात यावी यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करताना दिसत आहे. त्याचाच भाग म्हणून आता राज्य सरकारने कोरोनाच्या नव्या नियमावलीची घोषणा केली आहे. अनेकजण रुमालाचा वापर मास्क म्हणून करतात. याला आता चाप बसणार असून रुमालाला मास्क समजण्यात येणार नसल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. मास्कच्या ठिकाणी रुमालाचा वापर केल्यास 500 रुपये दंड लावण्याची घोषणा करण्यात येणार आहे. 

500 रुपयांपासून 50 हजारांपर्यंत दंड
लसीकरण न केलेल्या प्रवाशांना 500 रुपये दंड करण्यात येणार आहे तर विना लसीकरण प्रवास करत असल्यास वाहक किंवा चालक यांना 500 रुपये दंड करण्यात येणार आहे. तर खाजगी वाहक कंपनी मालकाकडून 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. राज्यातील दुकानदार, मॉल्स आणि खाजगी वाहतूक यांनी जर नियमांचा भंग केल्यास 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी नियमांचं उल्लंघन केल्यास 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

       नेहमी योग्य पद्धतीने मास्क परिधान करा. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे. (रुमालाला, मास्क समजले जाणार नाही आणि रूमाल वापरणारी व्यक्ती, दंडास पात्र असेल).

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article