-->
बारामतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Anti Corruption Bureau) कार्यालय होण्याची मागणी

बारामतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Anti Corruption Bureau) कार्यालय होण्याची मागणी

 बारामती - तालुक्यात मोठ्या प्रमाणात घोटाळे भ्रष्टाचार होत असल्याने बारामती तालुक्यात अॅन्टी करप्शन ब्युरोचे कार्यालय होण्याची मागणी पुणे जिल्हा रेशनकार्डधारक संघटनेने राज्याचे पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे. 
          माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेमुळे बारामती विकासाचे मॉडेल राज्यात गाजत आहे. कर्तबगार व धडाडीच्या नेतृत्व अजित पवार यांनी तालुक्याचा सर्वांगिण विकास करत बारामती तालुक्यात विज परिमंडल कार्यालय (४ जिल्ह्याचे) जिल्हा न्यायालय, एसटीची कार्यक्षाळा, अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालय, कृषी महाविद्यालय, मेडिकल कॉलेज, महिला हॉस्पिटल, आयुर्वेद हॉस्पिटल, यासारखी कार्यालये बारामतीत आणल्याने चार / पाच तालुक्यातील नागरिकांचा वेळ व पैसा वाचवला. 

         शासकीय अधिकारी बारामतीतच नोकरीची सेवा करण्याची संधी मिळावी म्हणुन प्रयत्न करतात.                                उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बारामती दौरा असल्यावर शासकिय अधिकारी व राजकीय पदाधिकारी प्रोटोकॉल प्रमाणे हजेरी लावून लुटपूट करतात. इतर वेळी शासकिय अधिकारी व पदाधिकारी सर्वसामान्य जनतेला फाट्याने हाणतात शासकिय अधिकारी सर्वसामान्यांची कामे कर्तव्याने करण्याची गरज असताना आज या उद्या या, याला भेटा त्याला भेटा, अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन दोन दिवासाच्या कामाला दोन दोन महिने लावतात. 

       गेल्या पाच वर्षात अधिकारी पैसे घेत असल्याच्या तक्रारी पुणे येथील अॅन्टी करप्शन ब्युरोकडे गेल्याने शंभर
अधिकारी कर्मचारी लाचेच्या जाळ्यात अडकल्याची उदाहरणे आहेत. यात पोलिस खाते व महसुल खाते आघाडीवर आहे. बारामतीतच अॅन्टी करप्शन ब्युरोचे कार्यालय झाल्यास बारामतीतील अधिकारी / कर्मचारी ताळेवर येतील असे रेशनकार्डधारक संघटनेचे अध्यक्ष राजेश वाघ व सचिव रामभाऊ तावरे यांनी सांगितले.
कायमचा धडा शिकवण्यासाठी
 भष्टाचारी अधिकारी / कर्मचारी आपला आर्थिक छळ करत असतील तर आमच्याशी संपर्क साधा + ९१२२-२४९ -२१२१२ ०२०२६१२२१३४ , ९९ ३० ९९ ७७०० acbwebmailmahapolice.gov.in

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article