
तिरुमला तिरुपती येथे जोरदार पाऊस; भाविकांनी काळजी घेण्याचे आवाहन - रिषि पांडे
Thursday, November 18, 2021
Edit
बारामती - प्रतिनिधी
प्रसिद्ध देवस्थान तिरुमला तिरुपती येथे सध्या मुसळधार पाऊस सुरू असून भाविकांनी काळजी घ्यावी. सुरक्षित ठिकाणी थांबावे असे आवाहन तिरुमला तिरुपती देवस्थान समितीचे विश्वस्त रिषि पांडे यांनी केले आहे.
तिरुमला तिरुपती येथे मुसळधार पाऊस सुरू आहे. रस्त्यावर ठीक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. काही ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाविक भक्तांनी काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी ते मुक्कामाला आहेत त्याच ठिकाणी सुरक्षित राहावे. ज्या भाविकांना काही अडचण असेल तर त्यांनी 09172599999 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रिषि पांडे यांनी केले आहे