
बारामतीच्या पश्चिम भागातील गावांत आज इंदिरा गांधी व राणी लक्ष्मीबाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी
Friday, November 19, 2021
Edit
मोरगाव : बारामतीच्या पश्चिम भागातील गावांत आज इंदिरा गांधी जयंती व झाशीची राणी लक्ष्मीबाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मोरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात सोमेश्वर साखर कारखान्याचे व्हा चेअरमण आनंदकुमार होळकर यांनी जयंती निमित्ताने प्रतीमेस पुष्पाहार अर्पण केला.
आज माजी पंतप्रधान ईंदीरा गांधी व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची जयंती मोरगावसह परिसरातील गावात उत्साहात संपन्न झाली. मोरगांव येथे ईंदीरा गांधी यांच्या प्रतीमेस सोमेश्वर कारखान्याचे व्हाइस चेअरमन आनंदकुमार होळकर यांनी तर लक्ष्मीबाई यांच्या प्रतीमेस कारखान्याचे संचालक किसन तांबे यांनी पुष्पाहार अर्पण केला . यावेळी मोरगावचे सरपंच निलेश हरिभाऊ केदारी, ग्रामसेवक मोरेश्वर गाडे, बबन तावरे तसेच इतर मान्यवर उपस्थितित होते.
या कार्यक्रम प्रसंगी होळकर यांनी शुरवीर, लढवय्या लक्ष्मीबाई यांच्या जीवनातील अनेक प्रसंग उपस्थितांना सांगीतले व शुभेच्छा दिल्या.