-->
बारामती: वडगांव निंबाळकरमध्ये भरपावसात रोमांचक क्रिकेट सामन्याची सांगता

बारामती: वडगांव निंबाळकरमध्ये भरपावसात रोमांचक क्रिकेट सामन्याची सांगता

 वडगाव निंबाळकर: ( प्रतिनिधी सुनील जाधव)
 बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर  परांडे मळा येथे क्रिकेट मैदान  येथे श्री शिवछत्रपती चषक आयोजित केले होते दोन दिवसीय हाप पीच 11स्टार क्रिकेट क्लब च्या वतीने क्रिकेटचे सामने नियोजन केले. ढगाळ वातावरण व झिरमिर पाऊस असतानाही क्रिकेटच्या मैदानावर अंगावर काटे येणारे असे चौकार -षटकार  पाहण्यास मिळाले.अटीतटीचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक मग्न झाले होते. यावेळी प्रथम बक्षीस राजेश्वरराजे संग्रामसिंह राजेनिंबाळकर, द्वितीय बक्षीस वैभव हिम्मत शिंदे तृतीय बक्षीस सौरभ लालासो दरेकर यांनी देण्यात आले. यावेळी विशेष सहकार्य ट्रॉफी- किशोर साळुंखे,स्टंप -अविनाश कदम भैरवनाथ बेकरी,बॉल -सुनील जाधव त्रिमूर्ती पशुआहार तसेच लमानेश्वर तरुण मंडळ व श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान या मंडळातील तरुणवर्ग मन लावून आपली जबाबदारी पार पडत होता. या  क्रिकेट सामने मध्ये प्रथम बक्षीस  11स्टार क्रिकेट क्लब वडगाव निंबाळकर  द्वितीय बक्षीस श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान भगवा चौक वडगाव निंबाळकर व तृतीय बक्षीस  महात्मा फुले क्रिकेट क्लब माळवाडी या संघांनी पटकावले. या क्रिकेट सामने मध्ये वडगाव निंबाळकर परिसरातील 20 क्रिकेट संघ यांनी हजेरी लावली होती. यावेळी मिळाला चांगला प्रतिसाद यामुळे येणाऱ्या काळात होणारे सामने मोठं - मोठ्या बक्षीस व जास्तीत जास्त दिवस आयोजित केले जातील अशी घोषणा आयोजकांनी केली आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article