-->
महाराष्ट्रातील मंत्री खासदार आमदार यांच्या पत्रावर तिरुपती बालाजी येथे दर्शन पास बंद. ऑनलाईन तिकीट काढावे  -रिषी पांडे, सदस्य - एल. ए. सी. तिरुमाला तिरुपती देवस्थान

महाराष्ट्रातील मंत्री खासदार आमदार यांच्या पत्रावर तिरुपती बालाजी येथे दर्शन पास बंद. ऑनलाईन तिकीट काढावे -रिषी पांडे, सदस्य - एल. ए. सी. तिरुमाला तिरुपती देवस्थान

बारामती -  प्रतिनिधी
आंध्रप्रदेश येथील तिरुमाला तिरुपती बालाजी मंदिरात आता महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, खासदार व आमदार यांनी दिलेल्या शिफारस पत्रावर बालाजी मंदिरात प्रवेश मिळणार नसून भाविकांनी आगावू ऑनलाईन तिकीट काढावे असे आव्हान तिरुमला तिरुपती देवस्थान चे एल. ए. सी. सदस्य रिषी पांडे यांनी केले आहे.
     महाराष्ट्रातून तिरुपती बालाजी येथे दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असल्याने अनेक भाविक भक्त दर्शनासाठी जात असतात. दर्शन सुलभ व्हावे यासाठी अनेक भाविक कॅबिनेटमंत्री, राज्यमंत्री आमदार व खासदार यांच्या शिफारशी चे पत्र घेऊन जातात. मात्र आता आंध्र प्रदेश सरकारच्या सूचनेनुसार अशा शिफारस पत्र आणणाऱ्या भाविकांना दर्शन मिळणार नाही त्यामुळे आपली होणारी गैरसोय टाळण्यासाठी भाविकांनी दर्शनाला येण्याआधीच ऑनलाईन तिकीट काढावे व मगच दर्शनाला यावे असे आवाहन तिरुमला तिरुपती देवस्थान च्या एल. ए. सी. चे सदस्य रिषी पांडे यांनी केले आहे

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article