
बारामती सहकारी बँकेच्या १५ जागांसाठी दाखल झालेल्या २३५ उमेदवारी अर्जापैकी ६८ अर्ज बाद; १०५ अर्ज वैध
या निवडणूकीमध्ये 15 जागांसाठी 235 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर त्या पैकी 68 अर्ज अवैध ठरल्याने आता 15 जागांसाठी 105 उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज माघारी माघारी घेण्याची मुदत 8 डिसेंबर असून 19 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने या महिनाअखेरीपर्यंत त्यांच्या पॅनेलची घोषणा केली जाण्याची शक्यता राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या पॅनेलमध्ये संधी मिळविण्यासाठी अनेक इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु असून अजित पवार यांनी पॅनेलमध्ये संधी मिळावी या साठी अनेकांनी हस्ते परहस्ते त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचविण्याचे प्रयत्न सुरु केले आहे.
दरम्यान बारामतीतील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी नवीन व जुन्या संचालकांचा मेळ घालणार असल्याचे विधान केल्यानंतर विद्यमान संचालकांसह काही माजी संचालक व नवीन इच्छुकांनीही मोर्चेबांधणी सुरु केली आहे.