
संविधान दिनानिमित्त भीम फाउंडेशनच्या वतीने कोऱ्हाळे बु पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप
Saturday, November 27, 2021
Edit
(प्रतिनिधी सुनिल जाधव)
वडगाव निंबाळकर :- दि. 26 नोव्हेंबर 2021 रोजी भीम फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संविधान दिन कोऱ्हाळे बुद्रुक, थोपटेवाडी, कुरणेवाडी, शिरीषने, म्हसोबावाडी या गावामध्ये असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी जाऊन वही पेन शालेय वस्तू मुलांना खाऊ वाटप व सुंदर अशी संविधानाची प्रत प्रत्येक शाळेला भेट देऊन उत्साहात संविधान दिन साजरी करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या वेळी भीम फाउंडेशनचे अध्यक्ष श्री गणेश गायकवाड , उपाध्यक्ष संजय साबळे, संस्थापक काकासाहेब सोनवणे, कामगार संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष-लखन कडाळे, सदस्य शंकर गायकवाड, मनोज ठोंबरे, कोमल चव्हाण, अक्षय सोनवणे, रवींद्र चव्हाण तसेच शाळेतील सर्व शिक्षक, प्रथम नागरिक सरपंच उपसरपंच,सदस्य, पोलिस पाटील उपस्थित होते.
शाळेतील सर्व मुले व नागरिकांनी यावेळी संविधानाचे वाचन केले. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार यावेळेस सांगण्यात आले. भारतीय संविधानानुसार देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याचा हक्क, धार्मिक हक्क, समतेचा हक्क, अन्यायाविरोधात लढण्याचा हक्क असे अनेक मूलभूत अधिकार संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला बहाल केले आहेत. हे प्राप्त झालेले हक्क आणि जबाबदाऱ्या जाणून घेणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे अशा या आपल्या देशाच्या संविधानाचा सन्मान , आदर, आणि अभिमान आपण सर्वांनी केला पाहिजे असे यावेळी सांगण्यात आले. तसेच 26 /11 रोजी हल्ल्यात शहीद झालेल्या शूर वीरांना आदरांजली यावेळी वाहण्यात आली.