
शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास रास्तारोको, शेतकरी संघटनेच्या वतीने कोऱ्हाळे बु शाखेला इशारा
Saturday, November 27, 2021
Edit
कोऱ्हाळे बु ।। - सोमेश्वर उपविभागात शेतीपंप विज ग्राहक थकबाकीदारांकडे मोठी थकबाकी झाल्याने महावितरण कंपनीने सरसकट डी . पी . सोडवले आहेत . त्यामुळे पाणी असुनही शेतीपीके करपून चालली आहेत.
शासन मोठ्या प्रमाणात विज वितरण कंपनीला अनुदान देत असतानाही महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे ३ एच. पीला ५ एच. पी ची, ५ एच.पी ला ७.५ एच पी तर ७.५ एच.पी ला १० ची आकारणी करुन शेतकरी वर्गाला भरडले जात आहे. वाढती महागाई, कोव्हिड परिस्थीती, शेतमालाला हमीभाव नाही, सोमेश्वरने गळीत हंगामात गेलेल्या ऊसाचे बिल दिले नाही. असे संकट असताना महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना वीज बिले भरण्याचा तगादा लावला आहे.
आज शेतकऱ्याकडे आर्थिक परिस्थीती बिकट असल्याने व महावितरण कंपनीकडे शेतकऱ्यांचीच येणे बाकी निघत असल्याचे कोर्टाने सिद्ध केले आहे. त्यामुळे विजबिले भरण्याचा संबंधच येत नाही. वीज पुरवठा सुरळीत करा अशा आशयाचे निवेदन शेतकरी संघटनेच्या वतीने कोऱ्हाळे बु ।। शाखेला देण्यात आले आहे.
यावेळी कल्याण भगत, अशोकराव खलाटे, राजेश वाघ, विजय नलवडे, जयवंत थोपटे, सुनिल गायकवाड, नारायण नलवडे, नंदकुमार सावंत, नानासो थोपटे, प्रमोद पानसरे, सचिन वाघ, विनोद नलवडे, तुकाराम पानसरे, वसंत जाधव उपस्थित होते.