
आता कष्टकऱ्यांनाही मिळणार पेन्शन; दरमहिन्याला जमा करा ५५ रुपये..... वयाच्या ६० व्या वर्षापासून मिळवा दरमहा ३६००० रुपये पेन्शन
दरमहा 55 रुपयांच्या बचतीची गरज
ही योजना सुरू केल्यावर तुम्हाला दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील. म्हणजेच, 18 व्या वर्षापासून दररोज सुमारे 2 रुपये वाचवून, तुम्हाला वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळू शकते. जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 40 व्या वर्षापासून ही योजना सुरू केली तर त्याला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील. तुम्हाला वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन मिळू लागेल. 60 वर्षांनंतर तुम्हाला दरमहा 3000 रुपये म्हणजेच वर्षाला 36000 रुपये पेन्शन मिळेल.
ही आवश्यक कागदपत्रे गरजेची
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बचत बँक खाते आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
कुठे नोंदणी करायची
- यासाठी तुम्हाला कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये योजनेसाठी नोंदणी करावी लागेल.
- कामगार CSC केंद्रात पोर्टलवर स्वतःची नोंदणी करू शकतात.
- सरकारने या योजनेसाठी वेब पोर्टलही तयार केले आहे.
- या केंद्रांद्वारे ऑनलाइन सर्व माहिती भारत सरकारकडे जाईल.
ही माहिती देणे आवश्यक
नोंदणीसाठी, तुम्हाला तुमचे आधार कार्ड, बचत किंवा जन धन बँक खाते पासबुक, मोबाइल नंबर आवश्यक असेल.
योजनेचे लाभार्थी
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजनेअंतर्गत, कोणत्याही असंघटित क्षेत्रातील कामगार, ज्यांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी आहे आणि कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नाही.
या योजनेत गुंतवणूक करू इच्छिनाऱ्या सदस्याचे मासिक उत्पन्न 15 हजारपेक्षा कमी असायला हवे.
या योजनेसाठी कामगार विभाग, एलआयसी, ईपीएफओचे कार्यालय सरकारने श्रमिक सुविधा केंद्र बनवले आहे. येथे जाऊन कामगारांना योजनेची माहिती मिळू शकते.
या योजनेसाठी सरकारने 18002676888 हा टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. या क्रमांकावर कॉल करूनही तुम्ही योजनेची माहिती मिळवू शकता.