-->
बौद्ध युवक संघटने तर्फे विविध क्षेत्रात संविधान पुस्तिका व प्रस्तावना भेट

बौद्ध युवक संघटने तर्फे विविध क्षेत्रात संविधान पुस्तिका व प्रस्तावना भेट

कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक या गावात बौद्ध युवक संघटनेमार्फत व अनिल दनाने पोलीस नायक यांच्या वतीने विविध क्षेत्रात संविधान पुस्तिकेचे व प्रस्तावना याचे वाचन व वाटप करण्यात आले कार्यक्रमास सुरुवात कोऱ्हाळे बुद्रुक ग्रामपंचायत येथून करण्यात आली कोऱ्हाळे बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये संविधान प्रत वाचून व संविधान पुस्तिका ग्रामपंचायतला भेट म्हणून देऊन कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमास गावचे सरपंच श्री रवींद्र खोमणे व उपसरपंच लताताई नलवडे तसेच ग्रामसेवक राजेंद्र शिंदे व इतर कर्मचारी व सदस्य उपस्थित होते मात्र काही ग्रामपंचायत सदस्यांना संविधान दिनाचा विसर पडल्याचे दिसून आले त्यानंतर श्री.नामदेवराव पाटील सार्वजनिक वाचनालय येथे संविधान पुस्तिका  प्रत देऊन कार्यक्रम करण्यात आला श्री अनिल दनाने साहेब (पोलीस नाईक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन) यांच्या हस्ते येथे संविधान पुस्तिका देऊन व प्रास्ताविका प्रतीचे वाचन करण्यात आले. पुढे श्री सिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे येथे  सर्व विद्यार्थ्यांकडून प्रस्तावना प्रत वाचन करून विद्यालयास संविधान पुस्तिका भेट म्हणून देण्यात आली या कार्यक्रमास सर्व शिक्षक वर्ग व मुख्याध्यापक उपस्थित होते. त्यानंतर  सिद्धेश्वर पब्लिक स्कूल येथे संविधान पुस्तिका भेट देण्यात आले त्यावेळी त्यानंतर वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे प्रमुख श्री सोमनाथ लांडे साहेब यांना संविधान पुस्तिका भेट म्हणून देण्यात आले येथे बुद्ध युवक संघटना अध्यक्ष महेश चव्हाण कोऱ्हाळे बुद्रुक सरपंच रवींद्र खोमणे वडगाव निंबाळकर माजी उपसरपंच साळवे तसेच लोकमान्य न्युज मराठी चे संपादक सोमनाथ जाधव व प्रतीक चव्हाण चोपडज गावचे माजी उपसरपंच उमेश गायकवाड इत्यादी उपस्थित होते त्यानंतर गोरगरिबांसाठी सदैव तत्पर असणारे व त्यांच्या न्यायासाठी लढणारे बारामतीचे सुप्रसिद्ध वकील ऍड.श्री अमोल जी सोनवणे साहेब व ऍड.श्री बापूसाहेब शीलवंत साहेब यांच्या ऑफिसला संविधान पुस्तिका भेट म्हणून देण्यात आली.
       या सर्व कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन बौद्ध युवक संघटनेचे अध्यक्ष श्री महेश चव्हाण व पोलीस नायक दनाने साहेब आणि प्रतीक चव्हाण यांनी केले होते

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article