
वडगांव निंबाळकरमध्ये निरा-बारामती राज्य मार्गाला अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या कापल्या
Friday, November 26, 2021
Edit
प्रतिनिधी सुनिल जाधव
वडगाव निंबाळकर- बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील नीरा-बारामती रस्त्या वरील संत सावतामाळी चौकामध्ये चिंचेच्या झाडाचा फांदा वाहतुकीस अडथळा निर्माण करीत होता. या झाडाच्या फांद्या मुळे मोठा घातपात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. वडगाव निंबाळकर येथील बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष व बारामती तालुक्याचे युवक अध्यक्ष अमोल गायकवाड यांनी तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभाग वडगाव निंबाळकर येथील सुळ साहेब यांच्याशी मोबाईल द्वारे संपर्क करून त्यांना या घटनेची माहिती दिली ही माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ त्या ठिकाणी आपले लोक पाठवून फांदा तोडून वाहतूक सुरळीत केली.
चिंचेच्या झाडाचा फांदा तोडून वाहतूक सुरळीत केल्यामुळे वडगाव निंबाळकर व परिसरातील ग्रामस्थांनी बहुजन हक्क परिषदेचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी बहुजन हक्क परिषदेचे चेतन साळवे, सलमान आतार, अनसार बागवान, सामाजिक कार्यकर्ते विजय हिरवे, दिलीप नेवसे व ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट- निरा-बारामती रस्त्यावरील वडगाव निंबाळकर येथील संत सावतामाळी चौकामध्ये चिंचेच्या झाडाचा फांदा वाहतुकीस अडथळा निर्माण करत होता. सार्वजनिक बांधकाम विभाग वडगाव निंबाळकर यांनी तात्काळ दखल घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
पै.नानासाहेब मदने