
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या घरपट्टी व पाणीपट्टी कराची वसुली वाढली; पहा तालुकानिहाय आकडेवारी
पुणे – कोरोना महामारीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. कोरोना काळात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळ राज्याच्या कर विभागालाही मोठी झळ बसली होती. अनेकठिकाणी घरपट्टी, पाणीपट्टी थकलेली होती.
कोरोना काळात सर्वसाधारणपणे 17 कोटी 13 लाखांची व पाणीपट्टीची 15 कोटी 71 लाख रुपयांची थकबाकी होती आता परिस्थिती निवळल्यामुळे चालू आर्थिक वर्षांत कर विभागाने थकबाकी वसुलीसह नवीन घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीवर अधिक भर दिला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत करा विभागानं जिल्ह्यात घरपट्टीमध्ये तब्बल 178 कोटी रुपयांची वसुली केली आहे. तर पाणीपट्टीत 29 कोटी 99 लाख रुपयांची वसुली झाली आहे .
विविध योजना राबवल्या
थकीत पाणीपट्टी व घरपट्टी वसूल करण्यासाठी विविध योजना राबवल्या. नेक ग्रामपंचायतीने थकबाकीसह चालू कर भरल्यास सवलत योजना जाहीर केली. याचाच परिणाम म्हणजे ग्रामपंचायतींच्या कर वसुली वाढली आहे. आता पर्यंत 50 टक्के कर वसुली झाली असून, पुढील चार महिन्यांत जास्तीत जास्त कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
ऑक्टोबर अखेरपर्यंत सर्वाधिक घरापट्टीही मूळशी तालुक्यातून तब्बल 44 कोटी 25 लाख इतकी वसूल झाली आहे. सर्वाधिक पाणीपट्टी जुन्नर तालुक्यातून 4 कोटी 39 लाख इतकी जमा झाली आहे. तर वेल्हा तालुक्यातून सर्वाधिक कमी घरपट्टी 1 कोटी 12 लाख तर पाणीपट्टी 50 लाख इतकी वसूल झाली आहे
तालुकानिहाय वसूल झालेली घरपट्टी, पाणीपट्टी (ऑक्टोबर अखेरपर्यंत)
तालुका घरपट्टी पाणीपट्टी
आंबेगाव 4 कोटी 25 लाख 1 कोटी 77 लाख
बारामती 5 कोटी 88 लाख 4 कोटी
भोर 5 कोटी 32 लाख 1कोटी 55 लाख
दौंड 7 कोटी 55 लाख 1 कोटी 48 लाख
हवेली 18 कोटी 37 लाख 3 कोटी 41 लाख
इंदापूर 6 कोटी 39 लाख 1 कोटी 98 लाख
जुन्नर 18 कोटी 3 लाख 4 कोटी 39 लाख
खेड 10 कोटी 88 लाख 1 कोटी 9 लाख
मावळ 14 कोटी 36 लाख 2 कोटी 67 लाख
मुळशी 44 कोटी 25 लाख 2 कोटी 31 लाख
पुरंदर 5 कोटी 12 लाख 1 कोटी 99 लाख
शिरूर 36 कोटी 49 लाख 2 कोटी 78 लाख
वेल्हा 1 कोटी 12 लाख 50 लाख
एकूण 178 कोटी 6 लाख 29 कोटी 99 लाख