-->
शेतकऱ्यांनी शेतीपंपाची विजबिले भरू नयेत; शेतकरी संघटनेचे अवाहन

शेतकऱ्यांनी शेतीपंपाची विजबिले भरू नयेत; शेतकरी संघटनेचे अवाहन

कोऱ्हाळे बु ।।- राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी शेतीपंपाची विजबिले भरू नका असे अवाहन शेतकरी संघटनेचे प्रवक्ते अशोकराव खलाटे यांनी केले आहे. 

          शेतमालाला हमीभावाइतकी रक्कम मिळत नसल्यामुळे शेतकरी संघटना कोर्टात गेली आहे. त्यावर न्यायमुर्तीनी विज बिल देणे लागत नाही असा निकाल दिला आहे . या निकालाला अधिन राहून युती सरकामधील उर्जामंत्री बावनकुळे यांनी दिनांक १/१०/२०२० रोजी चिफ इंजिनीअर एम.एस.ई.बी. यांनी ऑल ओ झोन यांना आदेश काढून कुठल्याही शेतकऱ्यांचे विज पुरवठा खंडीत करु नये असा आदेश दिला आहे. 

         अशा परिस्थीतीत विज वितरण कंपनीचे कोणतेही अधिकारी / कर्मचारी विज कनेक्शन कट करत असेल किंवा डीपी बंद करत असेलतील तर थकबाकादारांना १५ दिवस अगोदर नोटिस देणे बंधनकारकर आहे. तरीही पुर्वसुचना न देता विजपुरवठा खंडीत केला असेल तर अशोक खलाटे ( मो. ९ ४२०१७२२५७ ) यांच्याशी संपर्क साधावा असे अवाहन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

संघटनेचे अवाहन शासन व शेतकरी संघटना तोडगा शेतीपंपाची विजबिल प्रतीअश्वशक्ती वर्षाला ३०० रु वरुन २८२० वर गेल्याने शेतकरी संघटनेने शासनाच्या विरोधात आंदोलन केले होते. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आंदोलनावर तोडगा काढून शेतीसाठी २४ तास विजेकरीता ६७ % सरकार विजबिल भरेल व ३३ % शेतकरी भरेल असा आदेश काढला होता तरीही विज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना १६ तास विज न देता शासनाकडून २४ तासाचे पैसे घेतले. त्यामुळे शेतकऱ्यांचे विज वितरण कंपनीकडून येणे असल्याने उच्च न्यायालयात धाव घेतल्याने महावितरण कंपनीने पुढील आदेश येईपर्यंत शेतीपंपाचे विज कनेक्शन तोडू नयेत असे स्पष्ट लेखी आदेश दिले आहेत.
 
महामंडळाचा गलथान कारभार 

महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ असताना अध्यक्ष व वरिष्ठ कार्यकारी अभियंत्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याने महामंडळ तोट्यात घालवले शासनाने विज महामंडळाचे पारदर्शक व्यवहाराकरिता ३ कंपन्यांत रुपांतर केले. तरिही विज महामंडळ शेतकऱ्यांकडून शेतीपंपची विजबिले अव्वाच्या सव्वा घेऊन २४ तास मिळणारी विज १८ तासांवरुन ८ तासांवर आणली. नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर, फेज लिंका व्यवस्थित नसल्याने सेवा व्यवस्थित मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे विज पंप जळतात. याचा भुर्दंड शेतकरी वर्गाला बसत याला केवळ विज वितरण कंपनी जबाबदार आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article