-->
पत्रकारांनी सरकारकडून वैधानिक पध्दतीने आपले प्रश्न सोडविण्याची भुमिका घ्यावी.-वसंत मुंडे

पत्रकारांनी सरकारकडून वैधानिक पध्दतीने आपले प्रश्न सोडविण्याची भुमिका घ्यावी.-वसंत मुंडे

बारामती:- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांचे,  बारामती ( जि.पुणे) येथे रविवार दिनांक 20 नोव्हेंबर 2021 रोजी तालुका पत्रकार संघा च्या वतीने स्वागत करण्यात आले.काही कामानिमित्त बारामती येथे आले असता बारामती तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जाधव व  पत्रकार बांधव यांची भेट घेतली व कामाबाबत आढावा घेतला यादरम्यान त्यांनी पत्रकारांचे समस्या त्यांचे प्रश्न समजून घेतले,यावेळी बोलताना पत्रकारांना आपले प्रश्न का सुटत नाही ? मग ते इतरांचे प्रश्न कसे सोडवू शकतात का?आपले प्रश्न सोडविण्यासाठी स्वतःच्या मनाची तयारी केली पाहिजे, त्यासाठी आपले प्रश्न काय आहे ते कसे सोडविता येतील हे पहा, पत्रकारांनी गृहनिर्माण संस्था करण्यासाठी काम केले पाहिजे, त्यासाठी मी मदत करेल, सरकारशी केवळ संघर्ष करून प्रश्न सुटणार नाहीत. तर सरकारकडून वैधानिक पध्दतीने  मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी ची भूमिका घेतली पाहिजे.राजकीय संघटनाही अनेक आहेत पण प्रश्न  सोडणाऱ्या, संघटना,पक्षा च्या पाठिमागे  लोक राहतात. त्याचप्रमाणे पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करणाऱ्या संघटने बरोबर रहावे,याला महत्व दिले पाहिजे असे आवाहन केले. बारामतीकरांनी  स्वागत केले त्याबद्दल आभार मानले, पत्रकार संघ पदाधिकारी यांच्या मागणीवरून  अधिवेशनही बारामती मध्ये घेण्याचा विचार करू  असे सांगितले,यावेळी बारामती तालुकाध्यक्ष संतोष जाधव, कार्याध्यक्ष-फिरोज शेख, माजी.उपनगराध्यक्ष अनिल गायकवाड,पत्रकार सुनील शिंदे, स्वप्नील कांबळे,विराज शिंदे, बाळासाहेब गायकवाड, रमेश जाधव,प्रल्हाद जाधव, दळवी,गुळवे सर यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article