-->
बारामती पोलिसांकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त

बारामती पोलिसांकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त

बारामती : माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी पुणे ग्रामीण जिल्हा औद्योगिक जिल्हा आहे आणि या जिल्ह्यांमध्ये अनेक गुन्हेगार अग्नी शास्त्राचा वापर
करतात किंवा जवळ बाळगतात तरी सदर बाबत तीव्र मोहीम घेण्याबाबत वेळोवेळी लेखी तसेच बैठकांमध्ये तसेच सोशल मीडिया मार्फत पोलिसांना आदेश दिले आहेत व मोहिमा राबविण्याबाबत कळवलेले आहे. माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये बारामती शहर पोलिसांतर्फे रेकॉर्डवरील पूर्वी अग्नी शास्त्राचे गुन्हे दाखल होणारे गुन्हेगार चेकिंग मोहीम सुरु आहे या तपासणी मोहिमेतून पोलीस नाईक दशरथ कोळेकर यांना माहिती मिळाली की आरोपी प्रताप अमरसिंग पवार वय 21 वर्ष राहणार बागमळा तालुका 15 जिल्हा खंडवा मध्य प्रदेश सध्या राहणारा महादेव मळा पाटस रोड रिंग रोड सुरंजन हॉटेल बारामती जवळ हा लेबर कॉन्ट्रॅक्टर स्वतःजवळ एक अग्निशस्त्र बाळगून आहे ही माहिती मिळताच बारामती शहर पोलीस ठाणे कडील तपास पथक यांनी काल रात्री माननीय अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर छापा मारला व त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल मॅक्झिन व दोन 7.65 जिवंत काडतुसे असे एकूण पंचवीस हजार शंभर रुपयाचे मुद्देमाल जप्त केला आहे.मिळून आली सदरचा आरोपी हा मूळ मध्य प्रदेश येथील असल्याने त्याने तिथूनच ते हत्यार आणल्याचे सांगितले त्यांनी आणखी कुणाला आहे हत्यार विक्री केले आहे का तो लेबर लोकांना धाक दाखविण्यासाठी याचा वापर करत होतो का याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील पोलीस नाईक दशरथ कोळेकर कल्याण खांडेकर तुषार चव्हाण मनोज पवार अभी कांबळे व संपूर्ण तपास पथकाने केली आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article