-->
पुणे जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात ; २ जानेवारी रोजी मतदान ४ रोजी मतमोजणी

पुणे जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात ; २ जानेवारी रोजी मतदान ४ रोजी मतमोजणी

पुणे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीस मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यानंतर पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने शुक्रवारी (ता.२६) जाहीर केला.

        दि. २९ पासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होत आहे. बॅंकेच्या २१ संचालकांच्या निवडणुकीसाठी २ जानेवारी २०२२ रोजी मतदान घ्यावे,'' असे आदेश प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी दिले.

       मुंबई उच्च न्यायालयामध्ये पुण्यासह कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि मुंबई या जिल्हा बॅंकांच्या निवडणुकांसंदर्भात याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी होऊन शुक्रवारी न्यायालयाने निवडणुकांना परवानगी दिली. या संदर्भात दाखल याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने या संदर्भात या चिकाकर्त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक याचिका दाखल कराव्यात, असे निर्देश दिले. या निवडणुकांना दिलेली स्थगिती उठवली आहे. त्यानंतर सहकारी निवडणूक प्राधिकरणाने बॅंकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबले यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.

निवडणुकीसाठी विविध टप्पे जाहीर करण्यात आले आहेत. आजपासून (ता. २९) नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सहा डिसेंबर आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात (तिसरा मजला, पीडीसीसी बॅंक रोड, पुणे) शासकीय सुट्ट्या वगळून अर्ज दाखल करता येईल. नामनिर्देशनपत्राची सूची जसजशी प्राप्त होईल. त्याप्रमाणे दुपारी चार वाजता निवडणूक कार्यालयात प्रसिद्ध केली जाईल.

असा निवडणूक कार्यक्रम :
उमेदवारी अर्ज दाखल करणे...२९ नोव्हेबर ते ६ डिसेंबर
उमेदवारी अर्जाची छाननी...७ डिसेंबर
अर्ज मागे घेणे...८ ते २२ डिसेंबर
मतदान...२ जानेवारी
मतमोजणी...४ जानेवारी

उमेदवार पुढीलप्रमाणे :
मतदार संघ...उमेदवार संख्या
अ. तालुका प्रतिनिधी, विकास सोसायटी...१३
ब. कृषी, पणन, प्रक्रिया संस्था प्रतिनिधी...१
क. नागरी सेवा व पतसंस्था...१
ड. पाणीपुरवठा, ग्राहक व इतर संस्था...१
अनु. जाती, जमाती प्रतिनिधी...१
इतर मागासवर्ग प्रतिनिधी...१
वि.जा., भ.ज. वि.मा. प्रवर्ग प्रतिनिधी...१


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article