
गुरु विना विद्या नाही... गोड वाणी; माने मॅडम यांचा सेवापुर्ती सोहळा कार्यक्रम साजरा....
Saturday, November 27, 2021
Edit
बारामती :वडगाव निंबाळकर-
अतिशय संयमी आणि शांत स्वभाव,विद्यार्थी प्रिय शिक्षिका आणि ज्यांच्या माध्यमातुन वडगाव निंबाळकर आणि परीसरात अनेक विद्यार्थी घडले. आशा निर्मला माने मॅडम यांचा सेवापूर्ती समारंभ वडगाव निंबाळकर येथील स्वातंत्र्य विद्या मंदिर या ठिकाणी सोहळा पार पडला.सोहळ्या प्रसंगी जनता शिक्षण संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी एच.टी. बगनर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वरील विधान केले आहे.
वडगाव निंबाळकर (ता.बारामती) येथील जनता शिक्षण संस्थेचे स्वातंत्र्य विद्या मंदिर येथे निर्मला माने मॅडम यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभ अतिशय उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वातंत्र्य विद्या मंदिर चे प्राचार्य डी.ए. बनकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून जनता शिक्षण संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी एच टी बगनर तसेच पुरंदर पंचायत समितीचे उपसभापती गोरख माने, जनता शिक्षण संस्थेचे संचालक एस. ए. एजगर हे होते. यावेळी निर्मला माने व त्यांचे पती गोरख माने यांचा स्वातंत्र्य विद्या मंदिर या प्रशालेकडून सत्कार करण्यात आला.
यावेळी न्यू इंग्लिश स्कूल लाटे माळवाडीचे प्राचार्य के डी गिरमे माजी मुख्याध्यापक गलांडे सर स्वातंत्र्य विद्या मंदिरचे माजी क्रीडा शिक्षक सी एम जाधव सर महिला शिक्षिका मध्ये उर्मिला देशमुखे, बागल मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे नियोजन संस्कृतीक विभागाकडून काळे सर, शिंदे सर घोदे सर, गायकवाड सर,
नाईक सर, चौगुले सर, मोहितेमॅडम
भुंजे मॅडम यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी जी शिंदे यांनी केले तर आभार पोपट नाळे यांनी मानले.