-->
Breaking News:  १५ डिसेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात ४००० रुपये जमा होणार

Breaking News: १५ डिसेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात ४००० रुपये जमा होणार

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पुढील हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. जर शेतकरी दहाव्या हप्त्याची वाट पाहत असतील, तर 15 डिसेंबरला दहाव्या हप्त्याचे 2,000 रुपये खात्यात येणार आहेत.

आतापर्यंत सरकारने देशातील 11.37 कोटीपेक्षा जास्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात थेट 1.58 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त ट्रान्सफर केले आहेत. ज्या शेतकर्‍यांना अजूनपर्यंत 9व्या हप्त्याचा (PM Kisan) लाभ मिळालेला नाही त्या लोकांच्या खात्यात दोन हत्प्याचे पैसे एकाच वेळी म्हणजे त्यांच्या खात्यात 4000 रुपये ट्रान्सफर केले जातील. परंतु, ही सुविधा त्याच शेतकर्‍यांना मिळेल ज्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी रजिस्ट्रेशन केले असेल. जर योजनेंतर्गत  रजिस्टर शेतकरी दहाव्या हप्त्याची वाट पहात असतील तर 15 डिसेंबरला दहाव्या हप्त्याचे 2,000 रुपये त्यांच्या खात्यात येतील.

असे पहा आपले नाव सर्वप्रथमच अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा. होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल. Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List ऑपशनवर क्लिक करा. नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा. यानंतर Get Report वर क्लिक करा. नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article