-->
दहशतवादी कसाब चा फोन परमबीर सिंग यांनी ISI ला विकला असावा! निवृत्त एसीपीचा गंभीर आरोप

दहशतवादी कसाब चा फोन परमबीर सिंग यांनी ISI ला विकला असावा! निवृत्त एसीपीचा गंभीर आरोप

मुंबई पोलिसात असिस्टंट कमिश्नर ऑफ पोलीस म्हणजेच एसीपी राहिलेल्या शमशेर खान पठाण यांनी आज परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप मुंबईत घडलेल्या 26/11 प्रकरणाशी संबंधित आहेत.

त्यावेळी परमबीर सिंग हे ATS चे DIG होते. परमबीर सिंग यांनी दहशतावादी कसाबचा फोन हा आयएसआयला विकला असावा असा अत्यंत गंभीर आरोप निवृत्त एसीपी शमशेर खान पठाण यांनी केला आहे.

काय म्हटलं आहे शमशेर खान पठाण यांनी?

26/11 चा हल्ला ज्यावेळी मुंबईवर झाला. त्यावेळी परमबीर सिंग हे त्यावेळी एटीएसचे प्रमुख होते. पण त्यांना त्यावेळी आपल्या देशाऐवजी शत्रू राष्ट्राला पाठिंबा देणं उचित वाटलं असावं. त्यांची त्यावेळची कृती हेच सांगते. अजमल आमिर कसाब हा दहशतवादी जिवंत पकडला गेला होता. त्यावेळी त्याचा मोबाईल फोन हा परमबीर सिंग यांनी ताब्यात घेतला होता. त्या फोनचं पुढे काय झालं ते समजू शकलं नाही कारण तो फोन परमबीर सिंग यांनी ISI ला विकला असावा. कसाबचा खटला चालला त्यावेळी किंवा त्या दरम्यान कधीही या फोनबाबत कुठलंही स्पष्टीकरण समोर आलं नाही.

इंडिया टुडेशी बोलत असताना निवृत्त एसीपी शमशेर खान यांनी हा अत्यंत गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की मी तुम्हाला ज्या फोनबद्दल सांगतो आहे तो तोच फोन आहे ज्यावर कसाबला पाकिस्तानी हँडलर्स नेमकं काय करायचं आहे त्याच्या सूचना करत होते. त्या फोनमध्ये ही माहितीही असू शकते की ही घटना घडवण्यात भारतातल्या कुणाचा हात आहे? त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपी असतील त्यांना तातडीने अटक करण्याची गरज आहे.

आणखी काय म्हणाले शमशेर खान?

शमशेर खान पठाण यांनी जुलै 2021 मध्ये याच मुद्द्यावर मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले होते. 'मला हे प्रकरण प्रसिद्ध करायचे नव्हते कारण ते देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांना याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली. पण आता हे पत्र लीक झाल्यामुळे मला खात्री आहे की पोलिसांकडे सिंग यांच्या विरोधात काहीतरी आहे आणि त्यांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करावी. निवृत्तीनंतरची सामाजिक जबाबदारी म्हणून मी हे केले आहे.'

पत्रात शमशेर खान यांनी काय म्हटलं आहे?

पीआय एन. आर. माळी यांच्याशी मी या विषयावर सविस्तर चर्चा केली होती. दहशतावादी अजमल आमिर कसाबचा मोबाईल फोन त्यावेळी एटीएस डीआयजी असलेल्या परमबीर सिंग यांनी काढून घेतला होता. यासंबंधीची माहितीही त्यांनी त्यावेळी ड्युटीवर असलेल्या हवालदाराकडून घेतली होती. या प्रकरणी तपास अधिकारी रमेश महाले होते. मात्र परमबीर सिंग यांनी हा मोबाईल त्यांच्याकडे सोपवला नाही. परमबीर सिंग यांनी हा मोबाईल तपास अधिकारी रमेश महाले यांच्याकडे सोपवणं खूप आवश्यक होतं. कारण हा प्रकार म्हणजे अत्यंत महत्त्वाचा पुरावा नष्ट करणं आणि शत्रू राष्ट्राला मदत करणं असाच आहे.


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article