
1 डिसेंबरपासून jio च्या दरात मोठी वाढ होणार, 480 रुपयांपर्यंत प्लॅन महागले
एअरटेल, व्होडाफोन-आय़डिया नंतर आता जिओनेसुद्धा त्यांच्या रिचार्जच्या किंमतीत वाढ केली आहे.
एअरटेल, व्होडाफोन-आय़डिया नंतर आता जिओनेसुद्धा त्यांच्या रिचार्जच्या किंमतीत वाढ केली आहे.
जिओने ३१ रुपयांपासून ते ४८० रुपयांपर्यंतच्या रिचार्जचे दर वाढवले आहेत. जिओ फोनसाठी ७५ रुपयांचा रिचार्ज आता ९१ रुपये असणार आहे. तर १२९ रुपयांचा प्लॅन १५५ रुपयांना मिळणार आहे. एक वर्ष वैधता असलेल्या प्लॅनमध्ये सर्वाधिक वाढ झाली असून २३९९ रुपयांचा प्लॅन आता २८७९ रुपयांना मिळेल.
जिओच्या डाटा अॅड ऑन प्लॅनचे दरही वाढले आहेत. आता ६ जीबीचा ५१ रुपयांचा प्लॅन ६१ रुपयांना तर १०१ रुपयांचा १२ जीबी डाटा प्लॅन १२१ रुपयांना मिळणार आहे. तसंच ५० जीबी डाटाचा प्लॅन ५० रुपयांनी महाग झाला असून त्यासाठी ३०१ रुपये मोजावे लागणार आहेत.
व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना ७९ रुपयांचा प्लॅन ९९ रुपयांना मिळणार आहे. तर १४९ रुपयांचा रिचार्ज १७९ रुपये झाला आहे. तर १४९८ रुपयांच्या प्लॅनसाठी १७९९ रुपये मोजावे लागतील. २३९९ रुपयांचा प्लॅन आता २८९९ रुपयांना मिळेल. तर डेटा टॉपअपचे दरही वाढले असून ४८ रुपयांचा प्लॅन ५८ रुपयांना आणि २५१ रुपयांचा टॉपअप २९८ रुपयांना मिळणार आहे.