
......आणी बघता बघता जमा झाले ७० हजार रुपये; मासाळवाडीतील गोरे होमगार्डच्या कुटुंबीयांना वडगांव निंबाळकर पोलिसांच्या वतीने आर्थिक मदत
Wednesday, December 1, 2021
Edit
वडगाव : होमगार्डच्या कुटुंबियांवर आलेला दुःखाचा डोंगर सावरण्यासाठी पोलिसांनी मदतीचा हात पुढे करून आपल्या सहकाऱ्याला श्रद्धांजली अर्पण केली.
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या प्रशांत प्रकाश गोरे वय 25 रा. मासाळवाडी यांचे नुकतेच हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले ऐन तारुण्यात आपल्या सहकाऱ्याच्या कुटुंबियांवर आलेला दुःखाचा डोंगर केवळ शब्दांच्या मायेने सावरू शकत नाही यासाठी आपण सर्वांनी शक्य होईल तेवढी आर्थीक मदत कुटुंबीयांना करू असा प्रस्ताव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी आपल्या सहकार्याने पुढे ठेवला सर्व आंमलदारांनी आपल्या इच्छेप्रमाणे प्रमाणे मदत दिली.
आणि बघता बघता 70 हजार रुपये रोख रक्कम जमा झाली लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त ती रक्कम गोरे कुटुंबियांनच्या हाती जमा करून सहकाऱ्याला आदरांजली अर्पण केली. होमगार्ड हे पोलिसांच्या बरोबर काम करून सेवा बजावीत असतात. प्रशांतचा स्वभाव मनमिळावू होता ठाण्यातील अधिकारी आणि सर्व अंमलदार यांच्याशी त्याचे चांगले संबध होते. आपल्या कामावर निष्ठा असणाऱ्या सहकार्याचे आकस्मित निधनाची सर्वांनाच हळहळ आहे. प्रशांतचा भाऊ पोलीस भरतीसाठी प्रयत्न करीत आहे. खाकी वर्दी पुन्हा त्याच्या रूपातून घरात येईल असे मत लांडे यांनी सांत्वन करताना व्यक्त केले.
यावेळी नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुरलीधर ठोंबरे, सुभाष ठोंबरे, आप्पासो मासाळ, सोमाजी ठोंबरे, आप्पासो मासाळ, ज्ञानेश्वर पोमणे, राहुल बोरकर, पत्रकार सुदाम नेवसे, चिंतामणी क्षीरसागर, काशिनाथ पिंगळे उपस्थित होते. मासाळवाडी ता. बारामती येथिल होमगार्ड गोरे कुटुंबियांच्या हाती मदत रक्कम सुपूर्त करताना पोलिस अधिकारी.