
श्रीमंत दगडूशेठ हलवाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोकभाऊ गोडसे यांचे दुख:द निधन
Monday, December 6, 2021
Edit
मोरगाव : पुणे येथील मानांकित श्रीमंत दगडूशेठ हलवाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोकभाऊ तात्यासाहेब गोडसे यांचे आज दुख:द निधन झाले. अनेक सामाजीक कार्य त्यांनी ट्रस्ट मार्फत राबवली होती.
ससून सर्वोपचार रुग्णालय, अनाथ आश्रम यांना मोलाची मदत केली होती. पुरंदर तालुक्यातील ओढ्यातील गाळ त्यांच्या संकल्पने मुळे काढल्याने शेतकऱ्यांना फायदा झाल होता.
तसेच बारामती तालुक्यातील तरडोली गावातील शेतकऱ्यांच्या मागणीस्तव गेल्या दोन वर्षापुर्वी पुरंदर उपसा सिंचन योजनेतुन पाझर तलाव भरण्यासाठी त्यांनी ट्रस्ट मार्फत आर्थिक मदत केली होती. त्यांच्या निधनामुळे गणेश भक्तांकडुन मोठा शोक व्यक्त केला जात आहे