-->
सोमेश्वरच्या सभासदांसाठी आनंदाची बातमी; सभासदांना मिळणार एकरकमी २८६७ रुपये एफआरपी

सोमेश्वरच्या सभासदांसाठी आनंदाची बातमी; सभासदांना मिळणार एकरकमी २८६७ रुपये एफआरपी

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने संचालक मंडळाच्या मासिक सभेत चालू हंगामात तुटणाऱ्या उसाला प्रतिटन २८६७ रुपये एकरकमी एफआरपी जाहीर केली आहे.  
            आज सोमेश्वर कारखान्यावरील जिजाऊ सभागृहात संचालक मंडळाच्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, संचालक सुनील भगत, लक्ष्मण गोफणे, अभिजित काकडे, ऋषिकेश गायकवाड, जितेंद्र निगडे, प्रवीण कांबळे, प्रणिता खोमणे त्यांच्यासह सर्व उपस्थित होते.यावेळी बोलताना अध्यक्ष जगताप म्हणाले की, पैशांची उपलब्धता होताच एकरकमी २८६७ रुपये एफआरपी सभासदांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याचे सांगितले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article