
सोमेश्वर कारखान्याचे ४२ दिवसांत २.५० लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप
Saturday, December 4, 2021
Edit
कोऱ्हाळे बु ।। - पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ४२ दिवसांत सुमारे २.५० लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप करुन जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या तुलनेत १०.६३ रिकव्हरीत नं. १ ची बाजी मारत २ लाख ६३ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.
गेल्या वर्षी पाऊसकाळ चांगला झाल्याने सभासदांनी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केल्याने गाळपास येणारा मोठ्या प्रमाणात ऊस आहे. तसेच कारखाना कार्यक्षेत्रात बिगर नोंदिचा २ ते ३ लाख मेट्रीक टन ऊस उपलब्ध असल्याने इतर कारखान्यांनी सोमेश्वरची परवानगीने ऊसाचे गाळप करावे असे सोमेश्वरने जाहिर केले आहे. कारखान्याने हाती घेतलेले विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर चालू असून साधारण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पुर्ण होईल असा विश्वास व्यक्त करुन ९ ते १० हजार मे. टन क्षमतेने कारखाना चालणार असुन सभासदांच्या संपुर्ण ऊसाचे गाळप केले जाईल असे यादव यांनी सांगितले.