
स्वच्छतेत बारामती नापास ; एक शहर सांभाळता येत नाही आणि म्हणे पवार पंतप्रधानपदाचे दावेदार....भाजपचे नेते निलेश राणे यांची शरद पवारांवर टीका
पवार सगळ्यात नापास, एक तालुका, एक शहर सांभाळता येत नाही आणि म्हणे पवार पंतप्रधानपदाचे दावेदार. महाराष्ट्राची वाट लावली या कुटुंबाने पण फक्त आम्ही फार मोठे आहोत हे दाखवण्यात यशस्वी ठरले बाकी कामं सगळी बोगस, असं निलेश राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, देशात 2 ऑक्टोबर 2014 पासून केंद्र सरकारमार्फत 'स्वच्छ भारत अभियान' देशभरात राबवले जात आहे. बारामती नगर परिषदेने 'स्वच्छ सर्वेक्षण 2018'पासून राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतला होता. यामध्ये 2019मध्ये 325व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. याच मुद्द्यावरुन निलेश राणेंनी शरद पवारांवर टीका केली आहे.