
बारामती पोलिसांकडून संशयित मुद्देमाल म्हणून पावणे दोन लाखांचा ३० पोती तांदूळ जप्त
Wednesday, December 1, 2021
Edit
बारामती शहर पोलीस ठाण्याचे तपास पथक गस्तीवर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की छोटा हत्ती एम एच 42 AQ 5805यामधून स्वस्त धान्य दुकानात विक्रीसाठी ठेवलेला तांदूळ खुल्या बाजारात विक्रीसाठी जात आहे. सदर बातमीवरून सदर वाहन पोलिसांनी तपासले. त्यावेळी त्यामध्ये एकूण 30 पोती तांदळाची पन्नास किलो ची मिळून आली सदर बाबत चालक वैभव भारत दनाने राहणार तांदुळवाडी रोड बारामती याच्याकडे बिलाबाबत चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणतेही बिल मिळाले नाही. त्यानंतर सदरचामाल किराणा दुकानदार वसंत सोमनाथ पोटी राहणार खाटीक गल्ली याचा असल्याचे त्यांनी सांगितले त्याच्याकडे सुद्धा पोलिसांनी मालक खरेदीच्या पावत्या विचारले असता उद्यापर्यंत त्यांनी कोणत्याही पावत्या हजर करून दिलेल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांना खात्री झाली की सदरचा मालशासकीय बरदना बदलून खाजगी बारदाना मध्ये भरलेला आहे व खुल्या बाजारात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्याचे दाखवून विक्रीसाठी चाललेला होता. सदर मालाच्या खरेदीबाबत तेही कोणतेही पुरावा देऊ शकले नाही. त्यामुळे पोलिसांनी सदरचा टेम्पो व एक लाख 68 हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर आरोपी यांनी स्वस्त धान्य याबाबत असलेल्या शासनाच्या व माननीय जिल्हाधिकारी यांच्या कंट्रोल ऑर्डर चे उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आलेले आहे सदर दोन्ही आरोपीविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. सदर बाबत पुरवठा विभागाची मदत घेऊन सखोल चौकशी करण्यात येणार आहे. याप्रकारे शासकीय बारदाना बदलून धान्य खाजगी बारदाना भरून मार्केट मध्ये विकले जाते याबाबत शोध घेऊन यापुढेही कारवाया करण्यात येणार आहेत. धान्याची बिले जर खोटी असतील तर त्याबाबत ही कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे पोलीस नाईक दशरथ कोळेकर पोलीस नाईक खांडेकर पोलीस नाईक तुषार चव्हाण व पवार यांनी केलेली आहे.