
थोपटेवाडीत ९० लाख खर्चाचे सुमारे ११ रस्त्याची कामे मंजूर
Saturday, December 4, 2021
Edit
को-हाळे बु ।। बारामती तालुक्यातील थोपटेवाडी गावात डीपीडिसी फंडातुन सुमारे ९० लाख रुपये खर्चाची रस्त्याची कामे मंजूर झाल्याची माहिती जि.प. बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री पाठक यांनी दिली.
थोपटेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्यामार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केल्याने थोपटेवाडी चौफुला ते उंबरचारी रस्ता २० लाख, १६ फाटा ते सिताराम शिंदे व सुभाष सोनवणे घरापर्यंतचा रस्ता १० लाख, लाटे रोड ते सचिन अडागळे व धनंजय चव्हाण रस्ता १० लाख, लाटे रोड ते पडवळवस्ती व लालासो भगत रस्ता १० लाख, लाटे रोड ते हनुमान मंदिर व विकास जाधव रस्ता १० लाख, लाटे रोड ते यशवंत गावडे व अदिक पानसरे रस्ता १० लाख, लाटे रोड ते स्मशानभुमी रस्ता १० लाख व थोपटेवाडी हद्दीतील कॅप्टन चारी रस्ता १० लाख अशी ९ ० लाखांची कामे मंजूर झाली आहेत. गेल्या २ वर्षात गटातटाच्या राजकारणामुळे थोपटेवाडी गावात १ रुपयाचे काम न झाल्याने ग्रामस्थ वर्गात मोठी नाराजी आहे.
मंजूर रस्ते शासकीय गायराण जागेत होणार असल्याने विरोधक सदर कामे होऊ देणार की, वादाच्या भोवऱ्यात अडकवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.